शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजार घरांत बाप्पा विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 05:00 IST

जिल्ह्याच्या विविध भागात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी आणि विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड सुरू होती. गडचिरोलीत दरवर्षी इंदिरा गांधी चौक, मूल रोड, चामोर्शी रोडवर मूर्ती विक्रेते आपापली दुकाने थाटून बसत होते. यावर्षी मात्र मूर्तिकारांनी प्रशासनाच्या सहकार्याने धानोरा मार्गावरील जागेत शामियाना उभारून एकाच प्रांगणात मूर्ती विकण्याची सुविधा केल्याने नागरिकांच्याही सोयीचे झाले.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सुखकर्ता-दु:खहर्ता म्हणून ज्या देवतेला मोठ्या भक्तिभावाने पुजले जाते त्या गणेशाच्या १० दिवसीय उत्सवाला शुक्रवारपासून जिल्हाभर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. कोरोनामुळे सार्वजनिक उत्सवांवर मर्यादा असल्या तरी ३०० सार्वजनिक मंडळांकडून कोरोनाचे नियम पाळत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. याशिवाय २५०० ते ३००० घरांमध्ये बाप्पाला विराजमान करण्यात आले. जिल्ह्याच्या विविध भागात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी आणि विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड सुरू होती. गडचिरोलीत दरवर्षी इंदिरा गांधी चौक, मूल रोड, चामोर्शी रोडवर मूर्ती विक्रेते आपापली दुकाने थाटून बसत होते. यावर्षी मात्र मूर्तिकारांनी प्रशासनाच्या सहकार्याने धानोरा मार्गावरील जागेत शामियाना उभारून एकाच प्रांगणात मूर्ती विकण्याची सुविधा केल्याने नागरिकांच्याही सोयीचे झाले. विशेष म्हणजे त्यात पीओपीच्या मूर्ती विक्री करण्यास सर्व मूर्तिकारांनी सामूहिकपणे विरोध केल्याने हा यावेळच्या गणेशोत्सवातील महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. १०० पासून ते ४००० रुपयांपर्यंतच्या मूर्ती विक्रीसाठी होत्या.

ढोल-ताशे व गुलाल उधळण्यास बगलदरवर्षी सार्वजनिक मंडळांचे गणपती ढोल-ताशे लावून वाजत-गाजत मंडपात आणले जातात. पण, यावेळी प्रशासनाचे नियम पाळत ढोल-ताशे आणि गुलाल उधळून नाचत बाप्पाची मिरवणूक काढण्यास बगल देण्यात आली. केवळ गणपती बाप्पाचा जयघोष केला जात होता. घरगुती स्थापनेसाठीही उत्साहाने विविध वाहनांमधून मूर्ती नेल्या जात होत्या.

पाच दिवस चालणार विसर्जनजिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून वेगवेगळे पाच दिवस गणेशमूर्तींची विसर्जन गाव तलाव, नदी, नाले, आदी ठिकाणी होणार आहे. त्यात स्थापनेपासून सातव्या दिवशी (दि. १६) विसर्जनाला सुरुवात होईल. शेवटचे मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन दि.२० रोजी होणार आहे. हा उत्सव शांततेत आणि नियमांचे पालन करीत पार पाडण्यासाठी आणि कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त लावला आहे.

१५० गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’गावातील एकोपा कायम राहावा आणि सर्वांनी सोबत उत्सव साजरा करावा या भावनेतून प्रशासनाकडून ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेला प्रोत्साहन दिले जाते. त्यानुसार यावर्षी १५० गावांमध्ये ही संकल्पना राबविली जात आहे. त्यात गडचिरोली उपविभागातील ४४, कुरखेडा उपविभागातील ४०, धानोरा ७, पेंढरी (कारवाफा) ९, अहेरी १०, जिमलगट्टा ५, सिरोंचा २७ आणि एटापल्ली उपविभागात आठ गावांचा समावेश आहे. 

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव