शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

उद्योगांना कर्ज वाटपात बँकांचा अखडता हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : उद्योग स्थापन करू इच्छीणाऱ्याला कर्ज सुलभतेने उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासनाने एप्रिल २०१५ पासून ...

ठळक मुद्दे६,७९६ लाभार्थी : चार वर्षात ९१ लाखांचे कर्ज वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उद्योग स्थापन करू इच्छीणाऱ्याला कर्ज सुलभतेने उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासनाने एप्रिल २०१५ पासून मुद्रा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक बँकेला मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र बँका कर्ज वाटप करताना अखडता हात घेत असल्याचे दिसून येते. चार वर्षांच्या कालावधीत केवळ ९१ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले आहे.कोणताही व्यवसाय व उद्योग स्थापन करण्यासाठी पैसा ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. अनेक युवकांची व्यवसाय करण्याची इच्छा राहते. मात्र त्याच्याकडे निधी राहत नाही. त्यामुळे व्यवसाय सुरू करू शकत नाही. परिणामी बेरोजगारीचा सामना करावा लागतो किंवा इच्छा नसताना मिळेल ते काम करून पोट भरावे लागते. होतकरू तरूणांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी पैसे उपलब्ध व्हावे, या उद्देशासने केंद्र शासनाने एप्रिल २०१५ मध्ये मुद्रा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत व्यावसायिकाची क्षमता बघून कर्जाचे वितरण करायचे आहे. मात्र या योजनेअंतर्गतही बँका कर्जाचे वितरण करताना अनेक मापदंड लावून कर्ज वितरित करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते.एप्रिल २०१५ ते ३० मे २०१९ पर्यंत एकूण ६ हजार ७९६ लाभार्थ्यांना ९१ लाख २३ हजार रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. या योजनेचे शिशू, किशोर व तरूण असे तीन प्रकार पडतात. शिशू योजनेअंतर्गत ४ हजार ३२० लाभार्थ्यांना १९ लाख ७४ हजार रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. किशोर योजनेअंतर्गत २ हजार ४४९ लाभार्थ्यांना ४४ लाख ८ हजार रुपयांच्या कर्जाचे वितरण झाले आहे. तरूण योजनेअंतर्गत २८१ लाभार्थ्यांना २२ लाख २५ हजार रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. चार वर्षांत बँकांच्या कर्ज वितरणाकडे लक्ष दिल्यास बँका कर्ज वितरणात आखडता हात घेत असल्याचे दिसून येते.लावले जातात अनेक मापदंडकर्जाचे वितरण करताना बँका अनेक मापदंड लावत असल्याचे दिसून येते. नवीन व अनोळखी व्यक्ती कर्ज घेण्यास आल्यास त्या व्यक्तीला सहजासहजी कर्ज दिले जात नाही. विविध कारणे सांगून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जाते तर दुसरीकडे ओळखीच्या तसेच अगोदरच व्यवसायात जम बसलेल्या व्यावसायिकाला कर्ज देण्यासाठी बँका पुढाकार घेतात. बँकांच्या या धोरणामुळे गरजवंत युवक कर्जापासून वंचित राहते. जिल्ह्यातील बेरोजगारीची समस्या लक्षात घेतल्यास कर्जाचे वितरण अधिक प्रमाणात व्हायला पाहिजे, मात्र बँकांच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज वितरण होत नाही.

टॅग्स :bankबँक