दोन तास उशिरा उघडली बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:55 IST2018-05-14T22:55:30+5:302018-05-14T22:55:30+5:30
येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. सोमवार १४ मे रोजी बँक तब्बल दोन तास उशिरा उघडण्यात आली.

दोन तास उशिरा उघडली बँक
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. सोमवार १४ मे रोजी बँक तब्बल दोन तास उशिरा उघडण्यात आली. त्यामुळे सकाळपासूनच आर्थिक व्यवहार करण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या खातेदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे, येथील रिक्त पदे भरण्याची मागणी वारंवार करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे.
एटापल्ली येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेतील कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रिक्त असलेली पदे तत्काळ भरावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी नागरिकांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. परंतु आठ ते दहा दिवसांचा कालावधी उलटूनही काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. रिक्त पदे भरण्यासंदर्भात मागणी करूनही तसेच अनेक तक्रारी करूनही मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. सोमवारी एटापल्लीसह ग्रामीण भागातून अनेक खातेदार आले होते. परंतु कर्मचाºयांची कमतरता असल्याचे कारण पुढे करून तब्बल दोन तास उशिरा उघडण्यात आली.
बँकेत १ फिल्ड आॅफिसर, १ सर्व्हीस मॅनेजर, २ कस्टमर असिस्टंट व १ सुरक्षा कर्मचाºयाची आवश्यकता आहे. सदर रिक्त पदे भरावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी नगर पंचायतीच्या वतीने करण्यात आली होती. परंतु याबाबत काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये रोष आहे.
जनरेटरचाही अभाव
एटापल्ली येथील बँकेत जनरेटरचा अभाव आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास बँकेचे व्यवहार बंद पडतात. त्यामुळे कामाकाजावर परिणाम होतो. शिवाय येथील एटीएमही बंद अवस्थेत आहेत. तालुक्याची व्याप्ती लक्षा घेऊन २०१८ मध्ये जारावंडी व गट्टा येथे ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आले. परंतु सदर केंद्र सहा महिन्यांपासून बंद असल्याने एटापल्ली येथे खातेदारांची गर्दी वाढली आहे. जारावंडी व गट्टा तसेच कसनसूर येथे ग्राहक सेवा केंद्र सुरू केल्यास नागरिकांची गर्दी कमी होईल व त्यांचे कामही लवकर होईल. एटापल्ली येथे तीन सीएसपी केंद्र सुरू करण्यात आले. त्यापैैकी एक बंद आहे. तसेच जुन्याच इमारतीतून बँकेचे कामकाज सुरू आहे.