शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
3
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
4
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
5
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
6
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
7
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
8
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
9
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
10
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
11
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
13
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
14
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
15
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
16
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
17
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
18
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
19
Mumbai Murder: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
20
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
Daily Top 2Weekly Top 5

लिंक फेलमुळे बँक व्यवहार ठप्प

By admin | Updated: January 5, 2015 23:03 IST

शनिवारचा अर्धा दिवस, रविवारची सुटी यामुळे सोमवारी सर्वच बँकांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी जमली होती. मात्र बँकेची लिंक फेल असल्याने ग्राहकांना आल्यापावली परत जावे लागले.

गडचिरोली : शनिवारचा अर्धा दिवस, रविवारची सुटी यामुळे सोमवारी सर्वच बँकांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी जमली होती. मात्र बँकेची लिंक फेल असल्याने ग्राहकांना आल्यापावली परत जावे लागले. त्याचबरोबर एटीएमही सकाळपासूनच बंद असल्याने ग्राहकांच्या अडचणीत आणखी भर पडली.
जवळपास प्रत्येक नागरिकाचे बँकांमध्ये खाते आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक व व्यापारी बँकेच्या माध्यमातूनच आर्थिक व्यवहार करतात. सर्वच बँकांचे व्यवहार आॅनलाईन झाले असल्याने बँक व्यवहार सुरू राहण्यासाठी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. शनिवारी बँकेचे १ वाजेपर्यंतच कामकाज चालते. त्यामुळे या दिवशी बहुतांश व्यापारी व नागरिक बँकेत आर्थिक व्यवहारांसाठी न येता, सरळ सोमवारी बँकेत येणे पसंत करतात.
रविवारी गडचिरोली येथे बाजार भरत असल्याने सर्वाधिक आर्थिक उलाढाल याच दिवशी होते. या दिवशी जमा झालेला पैसा सोमवारी बँकेमध्ये भरल्या जाते. त्यानुसार आज व्यापारी व नागरिक बँकेत पैसे टाकण्याबरोबरच आवश्यक असलेले पैसे काढण्यासाठी आले असता, दुपारी २.३० नंतर लिंक फेल झाल्याने बँक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाला. त्यामुळे रांगेत लागलेल्या नागरिक व व्यापाऱ्यांना आर्थिक व्यवहार न होता परत जावे लागले. त्यामुळे आता तीन दिवसांचे पैसे स्वत:कडेच ठेवावे लागणार आहेत.
गडचिरोली तालुक्यात काही अपवादात्मक गावे वगळता राष्ट्रीकृत बँकाच नाहीत. त्यामुळे ३० ते ४० रूपये तिकीट खर्चुन हे नागरिक गडचिरोली येथे आले होते. तासभर रांगेमध्ये उभे राहिले. मात्र वेळेवरच लिंक फेल झाल्याने या नागरिकांनाही परत जावे लागले. त्यामुळे वृद्ध नागरिकांच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसून येत होता.
विशेष म्हणजे आज सकाळपासूनच लिंक फेल असल्याने शहरातील एसबीआय, बँक आॅफ इंडिया यांच्यासह इतर बँकांचे सर्वच एटीएम बंद होते. त्यामुळे पैसे काढणाऱ्या सामान्य ग्राहकांना अडचण झाली. एटीएमचा दरवाजा बंद असलेला बघून दुरूनच परत जात होते. बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ७ जानेवारी रोजी संप घोषित केला आहे. त्यामुळे याही दिवशी बँक व्यवहार ठप्प राहणार आहेत. परिणामी आता बँक व्यवहार करण्यासाठी केवळ उद्याचा दिवस शिल्लक आहे. उद्याही हिच परिस्थिती राहिल्यास आर्थिक समस्या तीव्र होणार आहे. (नगर प्रतिनिधी)