धानाेरात लाॅकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST2021-04-07T04:37:58+5:302021-04-07T04:37:58+5:30
राज्यात काेराेनाची दुसरी लाट निर्माण झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू केल्या आहेत. या आदेशाची ...

धानाेरात लाॅकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी जागृती
राज्यात काेराेनाची दुसरी लाट निर्माण झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू केल्या आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता मंगळवारी नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह बाजारपेठेत फिरुन व्यापाऱ्यांशी संवाद साधला. ध्वनीक्षेकपाद्वारे त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. अत्यावश्यक सेवा, किराणा, भाजीपाला, वैद्यकीय सेवा व इतर सेवा वगळता सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच शनिवार व रविवार हे दोन दिवस पूर्ण लॉकडाऊन पाळण्याची सूचना करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सुरू असल्याचे आढळल्यास कारवाई करून दुकाने सील केले जातील. तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनी कोरोनाची लस घ्यावी. शासनाच्या नियमांचे पालन करावे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग चे पालन, सॅनिटायजरचा वापर करावा, हात स्वच्छ धुवावे. याबाबत जागृती करण्यात आली. शासनाच्या नियमांप्रमाणे बाजारपेठ बंद ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.