लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : पंतप्रधान पीक विमा योजने बाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने जनजागृती वाहन गावागावात फिरविले जात आहे. धानोरा तहसील कार्यालयातून जनजागृती वाहनाला पंचायत समितीच्या सभापती अनुसया कोरेटी यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.पंतप्रधान पीक विमा योजनेची अधिकाधिक शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी तालुक्यातील गावागावांमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे योजनेची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना जुलैअखेर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या पिकांना विम्याचे संरक्षण द्यावे, असे आवाहन सभापती कोरेटी यांनी केले.पीक विमाबाबत जागृती वाहनाला रवाना करताना पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी. वाय. निमसरकार, तहसीलदार महेंद्र गणवीर, नायब तहसीलदार डी. आर. भगत, नायब तहसीलदार डी. एम. वाकुडकर, नायब तहसीलदार माधुरी हनुमंते, तालुका कृषी अधिकारी आनंद पाल, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयंत टेंभुर्णे, कृषी अधिकारी शिवाजी खटके, कृषी पर्यवेक्षक नीलकंठ बडवाईक आणि विमा योजनेचे तालुका प्रतिनिधी संतोष नायगमकर हे उपस्थित होते.यंदा सुरूवातीपासूनच पाऊस समाधानकारक नसल्याने शेतकºयांनी शेतकºयांनी पिकाचा विमा उतरवून विम्याचे संरक्षण घ्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.प्रतिकूल परिस्थितीत पिकांना मिळते संरक्षणनैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारखा आपत्तीपासून प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठिण परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, यासाठी पीक विमा योजना राबविली जात आहे. पंतप्रधान पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवावा, असे आवाहन करण्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले. सध्या चित्ररथाद्वारे ध्वनिक्षेपकावरून शेतकऱ्यांना जनजागृतीचे कार्यक्रम सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये जागृती होण्यास मदत होणार आहे.
चित्ररथाद्वारे दुर्गम भागातही पीक विम्याची जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST
पंतप्रधान पीक विमा योजनेची अधिकाधिक शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी तालुक्यातील गावागावांमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे योजनेची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना जुलैअखेर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या पिकांना विम्याचे संरक्षण द्यावे, असे आवाहन सभापती कोरेटी यांनी केले.
चित्ररथाद्वारे दुर्गम भागातही पीक विम्याची जागृती
ठळक मुद्देधानोरा तालुका : पं. स. सभापतींनी दाखविली हिरवी झेंडी; लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन