विविध उपक्रमांच्या माध्यमातून क्षयराेगाबाबत जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:35 IST2021-03-26T05:00:00+5:302021-03-25T23:35:01+5:30

जिल्हा कुष्ठरोग कार्यालयामध्ये जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सांळुखे, प्रमुख पाहुणे म्हणून  अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके, वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपेश पेंदाम उपस्थित होते.

Awareness about tuberculosis through various initiatives | विविध उपक्रमांच्या माध्यमातून क्षयराेगाबाबत जागृती

विविध उपक्रमांच्या माध्यमातून क्षयराेगाबाबत जागृती

ठळक मुद्देजागतिक क्षयरोग दिन साजरा, जिल्हाभरात नेमली १३ पथके

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था गडचिरोलीअंतर्गत क्षयराेगाच्या जागृतीबाबत विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले. 
जिल्हा कुष्ठरोग कार्यालयामध्ये जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सांळुखे, प्रमुख पाहुणे म्हणून  अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके, वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपेश पेंदाम उपस्थित होते.
जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून १३ क्षयरोग पथकाअंतर्गत विविध क्षयरोग जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी विविध शाळांमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा स्तरावर त्यांचे परीक्षण करण्यात आले. त्यांना जागतिक क्षयरोग दिनाच्या दिवशी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमामध्ये डॉ. अनिल रुडे, डॉ.सुनील मडावी, व डॉ. सचिन हेमके यांनी क्षयरोगाविषयी उपस्थित क्षयरुग्ण, आशा कार्यकर्त्या, शालेय विद्यार्थी व आरोग्य कर्मचारी व नागरिकांना मार्गदर्शन केलेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके यांनी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या ‘वेळ निघून जात आहे क्षयरोग उच्चाटन उद्दिष्ट गाठण्याची’ या घोषवाक्याच्या आधारे व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील इतरही आरोग्य संस्थांमध्ये विविध कार्यक्रम घेऊन जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. संचालन गणेश खडसे व आभार प्रदर्शन यू. वाय. डाबरे, यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्हाक्षयरोग कार्यालयातील डॉ. रूपेश पेंदाम , अनिल चव्हाण, नंदकिशोर आखाडे, राहुल रायपुरे, मनीष बोदेले, ज्ञानदीप गलबले, प्रमोद काळबांधे, लता येवले, वंदना राऊत, नजमा बेग आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

 

Web Title: Awareness about tuberculosis through various initiatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य