पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती करण्यासाठी व तालुक्यातील शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी तालुक्यातील गावागावांमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे योजनेची संपूर्ण माहिती दिली जात आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या पिकांना विम्याचे संरक्षण द्यावे, असे आवाहन सभापती कोरेटी यांनी केले. पंतप्रधान पीक विमा योजना कर्जदार, तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार डी. आर. भगत, नायब तहसीलदार माधुरी हनुमंते, तालुका कृषी अधिकारी आनंद पाल, मंडळ कृषी अधिकारी एल. एस. पाठक, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयंत टेंभुर्णे, चंदू प्रधान, नारायण चिलमवार, तुळशीराम तुमरेटी, वंदना दुधाबावरे, किरण मेश्राम, आशिक मडावी, विमा योजनेचे तालुका प्रतिनिधी संतोष नायगमकर उपस्थित होते.