शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांकडून युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:38 IST

कुरखेडा : धान पिकाच्या वाढीसाठी आता शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी वाढत आहे. याचा फायदा घेत काही व्यापारी युरियाचा कृत्रिम ...

कुरखेडा : धान पिकाच्या वाढीसाठी आता शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी वाढत आहे. याचा फायदा घेत काही व्यापारी युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढ्या दराने युरियाची विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे कृषी विभागाने कृषी दुकानदारांच्या स्टॉक आणि विक्रीची नियमित तपासणी करून गडबड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

येथील एका कृषी केंद्रात युरिया खत उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्या कृषी केंद्र चालकावर कारवाई करण्याची मागणी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे. कुरखेडा शहरात एकूण सात कृषी केंद्र चालकांकडून खत विक्री केली जाते. त्या कृषी केंद्रात युरिया खत नसल्याने शेतकरी बांधव निराश होऊन रिकाम्या हाताने आपल्या गावी जात आहेत. दरम्यान, काही शेतकऱ्यांना एका कृषी केंद्र चालकाकडे युरिया खत असल्याची माहिती मिळाली. शेतकऱ्यांनी त्या दुकानदाराकडे धाव घेतली; पण त्या ठिकाणी युरिया खताची चढ्या दराने विक्री होत असल्याचे प्रकरण दिसून आले.

शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जवाहर सोनकुसरे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन योग्य ती चौकशी करावी आणि कृषी केंद्र चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी शेतकरी देवानंद लोंहबरे, ईमरान कुरेशी, अंकुश कोकोडे, कमलेश दुर्वे, दुर्योधन साहरे, मोरेश्वर तुलावी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

(बॉक्स)

युरिया संपल्याचे सांगत शेतकऱ्यांची बोळवण

- युरियाची चढ्या दराने विक्री सुरू असताना काही शेतकऱ्यांनी आम्हालाही युरिया पाहिजे, असे म्हटले. त्यावर आमच्याकडे आता फक्त ११ युरिया बॅग उपलब्ध आहेत व अगोदर आलेल्या ग्राहकांना मिळणार आहेत, असे उत्तर त्यांना मिळाले. त्यामुळे तालुक्यातील काही युवा शेतकऱ्यांनी या संदर्भातील तक्रार कृषी अधिकारी गेडाम यांना देऊन घटनास्थळी नेले. तिथे जवळपास १०० युरियाच्या बॅग उपलब्ध असल्याचे दिसून आले.

- युरिया खत घेण्याकरिता गर्दी जमल्याने दुकानदार कृषी केंद्र बंद करून निघून गेला. दुकानदार शेतकऱ्यांशी खोटे बोलून प्रतिबॅग ३५० रुपये दराने विकत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी शेतकरी तालुका कृषी अधिकारी सुरभी बाविस्कर यांच्याकडे तक्रार देण्यासाठी गेले; पण त्या हजर नसल्याने त्यांनी भ्रमणध्वनीवरून शेतकऱ्यांशी बोलून पंचायत समितीचे कृषी अधिकारी गेडाम यांच्याकडे तक्रार देण्यास सांगितले.

020921\1857-img-20210902-wa0100.jpg~020921\img-20210902-wa0104.jpg

कृषी केंन्द्रात जमलेली शेतकर्यांची गर्दी~पंचायत कृषी अधिकारी गेडाम याना निवेदन देताना शेतकरी