शिकारीच्या प्रयत्नात हरणांसह शिकाऱ्याचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 01:03 IST2018-05-24T01:03:47+5:302018-05-24T01:03:47+5:30
विजेच्या तारांचा बसला झटका

शिकारीच्या प्रयत्नात हरणांसह शिकाऱ्याचाही मृत्यू
गडचिरोली : शिकारीसाठी लावलेल्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोन हरणांसह शिकाºयाचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे आलापल्ली-सिरोंचा मार्गावर मोसम गावाजवळील जंगलात घडली. विलास श्यामराव सडमेक (४०, रा. झिमेला) असे मृताचे नाव असून तो मूळचा व्यंकटापूरचा रहिवासी होता.
वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) जंगलात मुख्य मार्गावरून पूर्वेस १ किमी अंतरावर जिवंत विद्युत तारा टाकून शिकार करण्याचा प्रयत्न केला जात होता. या तारांना स्पर्श होऊन दोन हरणांसोबतच स्वत: शिकारीही मरण पावला.
या प्रकरणात मृतकासह आणखी किमान तीन व्यक्तींचा समावेश असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. अन्य आरोपींचाही लवकरात लवकर शोध घेतला जाईल, अशी माहिती एफडीसीएमचे विभागीय व्यवस्थापक सुनील पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.