आश्रमशाळा व्यसनमुक्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:00 AM2019-11-12T05:00:00+5:302019-11-12T05:00:47+5:30

स्थानिक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत सोमवारी शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय मुला, मुलींच्या वसतिगृहातील तंबाखूमुक्त समन्वयकांचे प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी ते बोलत होते. गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

Ashram school will be free from addiction | आश्रमशाळा व्यसनमुक्त होणार

आश्रमशाळा व्यसनमुक्त होणार

Next
ठळक मुद्देसहायक प्रकल्प अधिकाऱ्याचे प्रतिपादन : तंबाखूमुक्त समन्वयकांचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तंबाखूमुक्त संकल्पित आश्रमशाळा करणे आव्हानात्मक असले तरी अशक्य नाही. शाळेत चांगले बदल घडवून आणयचे असेल तर सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. तंबाखूमुक्त समन्वयकांच्या पुढाकाराने सर्व आश्रमशाळा तंबाखूमुक्त होणार, असा आशावाद सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी व्यक्त केला.
स्थानिक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत सोमवारी शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय मुला, मुलींच्या वसतिगृहातील तंबाखूमुक्त समन्वयकांचे प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी ते बोलत होते. गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर मुक्तिपथचे संचालक डॉ.मयूर गुप्ता, आदिवासी विकास सहयोगी रामेश्वर निंबोळकर, उपसंचालक संतोष सावळकर, सहायक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.मयूर गुप्ता यांनी तंबाखूमुक्त संकल्पित आश्रमशाळा कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये खर्रा व तंबाखू पदार्थाचे सेवन लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी तंबाखूमुक्त समन्वयकांची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत कर्मचाऱ्यांमधून एका नोडल अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. देखरेखीसाठी मुक्तिपथ चमू, प्रकल्प सुपरवायझर, आरोग्यविषयक तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टर, सर्व कर्मचारी व सहायक जिल्हाधिकारी यांची देखरेख, अशी संरचणा या कार्यक्रमासाठी राहणार आहे. तंबाखू सेवनाच्या आरोग्यावर होणाºया दुष्परिणामाची माहिती गुप्ता यांनी यावेळी दिली.
प्रशिक्षणाला अटल आरोग्य वाहिनीचे डॉ.अभिषेक गव्हारे, डॉ.खुशबू गहाणे, डॉ.रोशन सोनवने, डॉ.पायल रामटेके, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पी.एल. कन्नाके, डब्ल्यू.के.कोडापे, माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, डी.वाय.मेश्राम, टी.एम.सोनकुसरे, एन.एस.पुरी, जी.टी.डोंगरवार आदीसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. यावेळी यमराजाचा फास हे चित्रपट दाखविण्यात आला. तसेच कोटपा कायद्याची माहिती देण्यात आली.

व्यसनमुक्तीसाठी कृतिशील कार्यक्रमाची अंमलबजावणी
गडचिरोली प्रकल्पातील सर्व आश्रमशाळा व्यसनमुक्त करण्यासाठी कृतीशील कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. आश्रमशाळा व वसतिगृह विभाग असे स्वतंत्र नियोजन करून हा कार्यक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमानुसार प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांचे खिशे तपासणे, व्यसमुक्तीचे गीत गायन, पालक भेटीच्या वेळी तपासणी करणे, पालकाकडून पाल्याला खर्रा, तंबाखू, नसगुल मिळते का, मिळत असल्यास यावर प्रतिबंध करणे. शाळेच्या आवारात शिक्षक, कर्मचारी यांना तंबाखू व दारू सेवन करण्यास बंदी घालणे, नोडल अधिकारी नियमित लक्ष ठेवतील. विद्यार्थी साहित्याचे पेट्या तपासणे, डॉक्टरांद्वारे गरजू विद्यार्थ्यांची तपासणी करणे आदी कृती आश्रमशाळांमध्ये करण्यात येणार आहे. याशिवाय गावातील पानठेलाधारकांना सूचना देणे, विद्यार्थी व शिक्षकांची रॅली काढण्यात येणार आहे.

Web Title: Ashram school will be free from addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.