शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कच्च्या कैऱ्यांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2017 01:30 IST

गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यासह विविध भागात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आमराया आहेत.

५० ते ६० रूपये किलो : आंब्याच्या चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यासह विविध भागात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आमराया आहेत. यंदा वातावरण अनुकूल असल्याने गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने आंब्याच्या झाडांना मोठा बहर आला आहे. त्यामुळे आमराया आंब्यामुळे झाकाळून गेल्या आहे. ग्रामीण भागातून तालुका मुख्यालय व जिल्हा मुख्यालयात दररोज मोठ्या प्रमाणावर आंबे विक्रीसाठी आणले जात आहे. साधारणत: ५० ते ६० रूपये किलो दराने कच्च्या कैऱ्या (आंबे) विकले जात आहे. १५ ते २० रूपये पाव असा भाव सध्या दिसून येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आंब्यांची खरेदी ग्राहकांकडून केली जात आहे. काही शेतकरी आपला आंब्याचा माल व्यापाऱ्यांना विकून मोकळा होत आहे. तर काही शेतकरी स्वत:च दिवसभर शहराच्या ठिकाणी बसून आपल्या आंब्यांची विक्री करीत आहे. त्यामुळे त्यांना जादा भाव मिळत आहे. सध्या बाजारात रसाळ आंब्यांचेही आगमन झाले असून १२० रूपये किलो या दराने हे आंबे विकले जात आहे. त्यामुळे यावर्षी आंब्याचे मोठे व चांगले उत्पादन होण्याची आशा आंबा उत्पादकांनी व्यक्त केली आहे.