गडचिरोली शहरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:34 IST2021-05-01T04:34:23+5:302021-05-01T04:34:23+5:30

यामध्ये शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये कोविड रुग्णांसाठी ५० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यास भौतिक सुविधा व आवश्यक जागा मुबलक ...

Approval to start Kovid Care Center in Gadchiroli city | गडचिरोली शहरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यास मंजुरी

गडचिरोली शहरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यास मंजुरी

यामध्ये शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये कोविड रुग्णांसाठी ५० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यास भौतिक सुविधा व आवश्यक जागा मुबलक असून, ही इमारत नगरपरिषद क्षेत्रात मोडत असल्याने प्रशासनाच्या दृष्टीने सोयीचे आहे. त्यामुळे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र गोकुलनगर अंतर्गत ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना विनंती पत्र दिलेले आहे. वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत गडचिरोली नगरपरिषदेला रुपये एक कोटी अनुदान प्राप्त होणार असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना व कृती आराखडा तयार आला. यामध्ये वाहन खरेदी (स्वर्गरथ) १८ लक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती ३० लक्ष, साहित्य खरेदी १७ लक्ष ८९ हजार, कोविड सेंटर विदुतीकरण व इतर दुरुस्ती १२ लक्ष, कोविड रुग्णालयासाठी औषधी खरेदी १० लक्ष व मनुष्यबळ १५ लक्ष ९ हजार रुपये एवढा खर्च अपेक्षित केला आहे. कोविड मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने मोक्षधाम येथे अंत्यसंस्कारासाठी आवश्यक व अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यासाठी नियोजन करण्यात आले. शहरातील कठाणी नदी किनारी असणाऱ्या स्मशानभूमीमधील शेड कमी पडत असल्याने तेथे अतिरिक्त शेडचे बांधकाम व रेटेनिंग वॉलचे बांधकाम करणे, मोक्षधामाचे सौंदर्यीकरण करणे, तसेच मोक्षधामला जोडणारा पोच रस्ता कच्या स्वरूपात असल्याने सदर रस्त्याचे बांधकाम करणे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान निधी अंतर्गत मोक्षधाम येथे वीज दाहिनीची सुविधा उभारणे, नागरी प्राथमिक केंद्र गोकुलनगर हे नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत असून ही इमारत ही जुनी आणि कवेलुची असल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी आतमध्ये शिरत असल्याने औषधी साठ्याचे खूप नुकसान होत असते. त्यामुळे तेथे खालील उपाययोजना करण्यात येत आहे. इमारतीचे छत, वैद्यकीय अधिकारी यांच्याकरिता केबीन, रुग्ण तपासणी करण्याकरिता तपासणी टेबल, औषधी साठा खराब होऊ नये म्हणून औषधी रँक, रुग्णांकरिता बसण्याची व्यवस्था, अतिआवश्यक असलेले औषधी व इंजेक्शन ठेवण्याकरिता फ्रिज व रुग्णांकरिता बाहेर बसण्याकरिता शेडची व्यवस्था हाेईल अशा अनेक सोयीसुविधांचा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोविड-१९ रुग्णांची गैरसोय होऊ नये याकरिता या सभेमध्ये नियोजन करण्यात आले आहे.

यावेळी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, सभापती मुक्तेश्वर काटवे, सभापती प्रशांत खोब्रागडे, मुख्याधिकारी संजीव ओव्होळ, नगरसेवक प्रमोद पिपरे, लता लाटकर, वैष्णवी नैताम, नीता उंदिरवाडे, नितीन उंदिरवाडे, आनंद शृंगारपवार,सतीश विधाते, रितु कोलते, अनिता विश्रोजवार, अल्का पोहनकर, रमेश चौधरी, गुलाब मडावी, गीता पोटावी, संजय मेश्राम, पूजा बोबाटे, रमेश भुरसे, सतीश विधाते सभेला उपस्थित होते.

Web Title: Approval to start Kovid Care Center in Gadchiroli city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.