कोरडा दुष्काळ जाहीर करा

By Admin | Updated: August 28, 2014 23:48 IST2014-08-28T23:48:31+5:302014-08-28T23:48:31+5:30

जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, या प्रमुख मागणीसह १६ विविध मागण्यांसाठी कुरखेडा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गुरूवारी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या

Announce dry drought | कोरडा दुष्काळ जाहीर करा

कोरडा दुष्काळ जाहीर करा

कुरखेडा : जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, या प्रमुख मागणीसह १६ विविध मागण्यांसाठी कुरखेडा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गुरूवारी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात मोर्चा नेण्यात आला. या मोर्चात ५ हजार शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते.
या मोर्चाचे नेतृत्व जि. प. च्या सभापती छाया कुंभारे, निरांजनी चंदेल, डॉ. महेंद्र मोहबंशी, नरेंद्र तिरनकर, जि. प. सदस्य अशोक इंदूरकर, पं. स. उपसभापती बबन बुद्धे, पं. स. सदस्य चांगदेव फाये, जि. प. सदस्य पद्माकर मानकर, राकेश बेलसरे, सुनंदा आचला, नसरू भामानी, गोविंदा दरवडे, गुड्डू अग्रवाल, महादेव पुंगळे, धिसूपाटील खुणे, कविता दडमल, लोमेश कोटांगले, देवा खुणे, अशोक कंगाले, नंदू चावला, दशरथ लाडे, जयराम नैताम, आनंदराव जुमनाके, रोशन सय्यद, वासुदेव बट्टे, विनोद नैताम, रवी गोटेफोडे, यशवंत खुणे, गणेश तुलावी, मुन्नेश्वर लांजेवार आदींनी केले. या मोर्चेकऱ्यांच्यावतीने १६ मागण्यांचे निवेदन शासनाकडे सादर करण्यात आले आहे. यामध्ये पाऊस कमी पडल्याने दुबार पेरणी करावी लागली. शेतकऱ्याला ८ हजार रूपये प्रति हेक्टरी मदत द्यावी. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, वनपट्टे देण्याची कारवाई सुरू करावी, वनविभागाने पट्टे न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या ताब्यात घेतलेल्या जमिनी परत द्याव्या आदी प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Announce dry drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.