शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतकऱ्यांची महावितरणच्या अधिकाऱ्यांविराेधात पाेलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:35 IST

उन्हाळी धान पिकाच्या हाेणाऱ्या नुकसानीला विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन ...

उन्हाळी धान पिकाच्या हाेणाऱ्या नुकसानीला विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन जि. प. चे माजी सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी घिसू खुणे व दशरथ लाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पाेलीस निरीक्षकांना दिले. दिलेल्या तक्रारीवजा निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, सध्या उन्हाळी धान पीक जाेमात आहे. सुरवातीला या फीडरवरील कृषी पंपाना विद्युत पूरविणाऱ्या वाहीनीवर १६ तासाचे भारनियमन सुरू करण्यात आले. त्यामुळे या परिसरातील ४०० पेक्षा अधिक धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. या भागात रबी हंगामात उन्हाळी धान पिकाची लागवड माेठ्या प्रमाणात केली जाते. दरम्यान कुरखेडा-वडसा मार्गावर आमदार कृष्णा गजबे व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात दिवसभर चक्काजाम आंदोलन तसेच अधिकाऱ्यांना घेराव करण्यात आला होता. या आक्रमक आंदोलनाची दखल घेत त्यावेळी १६ तास भारनियमनाचा आदेश मागे घेत विद्युत पूरवठा सुरळीत करण्यात आला होता. यानंतर या परीसरातील शेतकऱ्यांंनी माेठी अपेक्षा बाळगुन उत्साहाने रबी हंगामात धानाची पेरणी केली. मात्र ऐन हंगामात पुन्हा मागे घेण्यात आलेल्या भारनियमनाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून १६ तासांचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजतापर्यत विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. या आठ तासात धान पिकाला पाणी पुरवठा करणे अशक्य आहे. धान पिकाला अधिक पाण्याची गरज असते. त्यामुळे परिसरातील धान पीक पाण्याअभावी करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. हंगामाच्या सुरवातीला आंदोलनानंतर सुरळीत विद्युत पुरवठा करण्याचे आश्वासन देत पुन्हा भारनियमन लागू करणे ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. धान पिकाच्या होणाऱ्या नूकसानीला विद्युत वितरण कंपनीचा अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असे म्हटले आहे.