शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अन् अहेरीचे एसडीओ बनले शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 06:00 IST

आदिवासी विद्यार्थी स्पर्धेमध्ये टिकणारा बनावा, या उद्देशाने इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी एकलव्य रेसिडेन्सी पब्लिक स्कूल नावाने सीबीएसई अभ्यासक्रम असलेली शाळा सुरू केली. या शाळेत ६ ते बारावीपर्यंत वर्ग आहेत. ३३४ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. बारावीत यावर्षी एकूण १९ विद्यार्थी आहेत.

ठळक मुद्देतीन विभागांचा प्रभार सांभाळून अध्यापन

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी येथील एकलव्य रेसिडेन्सी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक नसल्याने अहेरीचे एसडीओ राहूल गुप्ता (भाप्रसे) यांनी शिक्षकाची जबाबदारी स्वीकारत बाराव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे, गुप्ता हे अहेरीचे एसडीओ आहेत, नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा तसेच अहेरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकाऱ्याचाही प्रभारी त्यांच्याकडे आहे. या सर्व व्यस्त कामातून त्यांनी वेळ काढून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य सुरू केले आहे.आदिवासी विद्यार्थी स्पर्धेमध्ये टिकणारा बनावा, या उद्देशाने इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी एकलव्य रेसिडेन्सी पब्लिक स्कूल नावाने सीबीएसई अभ्यासक्रम असलेली शाळा सुरू केली. या शाळेत ६ ते बारावीपर्यंत वर्ग आहेत. ३३४ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. बारावीत यावर्षी एकूण १९ विद्यार्थी आहेत. मात्र भौतिकशास्त्राच्या शिक्षक पदासाठी अनेक वेळा जाहिरात देऊनही शिक्षक मिळाला नाही. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन एसडीओ गुप्ता हे सायंकाळी ६ ते ८ या कालावधीत विद्यार्थ्यांना अध्यापन करीत आहेत. मोबाईल प्रोजेक्टर अशा विविध शैक्षणिक साधनांचा वापर करून अध्यापन करीत आहेत. व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत अध्यापन करीत असल्याने त्यांचे हे कार्य इतर अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक