लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड (गडचिरोली) : तालुक्यातील अतिदुर्गम येथे नेलगुंडा शेतात खाटेवर झोपलेल्या वृद्धाची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना १० जानेवारी रोजी मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून मारेकऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, पुसू नरंगो हबका (६६ वर्ष, रा. नेलगुंडा ता. भामरागड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पुसू हबका हे शनिवारी रात्री आपल्या घराजवळील शेतात रखवालीसाठी खाटेवर झोपले होते, तर बाजूच्या खाटेवर त्यांची पत्नी झोपली होती. दरम्यान, मध्यरात्री १२:३० च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, पुसू यांचा जागीच मृत्यू झाला. पुसू यांच्या पत्नीने आरडाओरड केल्यावर इतर लोक धावले, त्यानंतर घटनेची माहिती नेलगुंडा पोलिसांना देण्यात आली. नेलगुंडा पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
शेतीच्या वादाची किनार ?
पुसू हबका यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही. मात्र, शेतीच्या वादातून त्यांना संपविण्यात आले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. या घटनेमुळे नेलगुंडा गावात शोककळा पसरली असून मृताच्या पश्चात पत्नी आणि दोन नातवंडे असा परिवार आहे.
Web Summary : An elderly farmer, Pusu Habka, was brutally murdered in his field in Nelgunda, Gadchiroli. He was sleeping on a cot when unknown assailants slit his throat. Police suspect a land dispute as the motive. Investigation underway.
Web Summary : गढ़चिरोली के नेलगुंडा में एक वृद्ध किसान पुसू हबका की खेत में सोते समय अज्ञात हमलावरों ने गला रेतकर हत्या कर दी। पुलिस को जमीन विवाद का संदेह है। जांच जारी है।