गडचिराेली : मागील वर्षीपासून जीवनावश्यक वस्तूंचे दर झपाट्याने वाढत आहेत. सध्या भाजीपाला बराच महाग विकला जात आहे. त्यासाेबतच विविध डाळींच्याही किमती वधारल्या आहेत. भाजीपाल्यासाेबत डाळही आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे अनेकजण मसूर डाळीचा वापर आहारात करीत आहेत. गुरुपाैर्णिमेपासून अनेक सण उत्सव सुरू हाेतात. त्यामुळे डाळींचा वापर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी केला जाताे. तसेच खाद्यतेलाचीही मागणी वाढते. अशास्थितीत डाळ व भाजीपाल्याच्या किमतीत पुन्हा दरवाढ झाल्यास सर्वसामान्य नागरिकांचे हाल हाेण्याची शक्यता आहे.
बाॅक्स ......
आवक घटल्याने डाळ महागली
मागील वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात अल्प पाऊस झाला तसेच कृत्रिम महापूर आला. या संकटामुळे अनेकांची शेती बुडाली. शेतीच्या बांधावर लागवड केलेले तुरीचे पीक सडले. याशिवाय अल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कडधान्य पिके घेतली नाही. परिणामी शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत आला नाही. काेराेना लाॅकडाऊनमुळे अन्य जिल्ह्यातूनही फारशी आवक झाली नाही. त्यामुळे डाळीचे दर वधारले.
बाॅक्स .....
ग्रामीण भागातून भाजीपाला येणे बंद
रबी हंगामात अनेक शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतात. जवळपास उन्हाळभर बाजारपेठेत ग्रामीण भागातील भाजीपाला आणला जाताे. परंतु आता पावसाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातून भाजीपाला येणे बंद झाले आहे. याचा परिणाम भाजीपाल्याच्या किमती बऱ्याच वधारल्या.
काेट ......
आमच्या कुटुंबात एकूण आठ सदस्य आहेत. त्यामुळे एक किलाेच्या जवळपास भाजीपाला एका वेळेसाठी लागताे. सध्या भाजीपाला महाग झाला आहे. त्यामुळे वरण व उसळ अधिक प्रमाणात बनविला जात आहे.
- सुगंधा मडावी, गृहिणी
काेट .......
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी माेठ्या प्रमाणावर महागाई वाढली. याचा परिणाम गृहिणींच्या आर्थिक बजेटवर झाला आहे. माेठी काटकसर करून संसाराचा गाडा चालवावा लागत आहे. शासनाने जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावे.
- नीलिमा डाेईजड, गृहिणी