पुन्हा 13 जणांचा मृत्यू; काेराेनाबाधितांचा नवा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 05:00 IST2021-04-19T05:00:00+5:302021-04-19T05:00:27+5:30

मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. दरदिवशी १० ते १५ रुग्णांचा मृत्यू हाेत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील विषाणू आक्रमक आहे. त्यामुळे पूर्वीच्या लाटेच्या तुलनेत मृतकांची संख्या आता अधिक आहे. तसेच संसर्ग हाेण्याचे प्रमाणही अधिक आहे. एकाच दिवशी ४०० ते ५०० नागरिक काेराेनाबाधित हाेत आहेत. असे असतानाही नागरिक रस्त्यांवर अनावश्यक फिरत आहेत.

Again 13 people died; New high for carnivores | पुन्हा 13 जणांचा मृत्यू; काेराेनाबाधितांचा नवा उच्चांक

पुन्हा 13 जणांचा मृत्यू; काेराेनाबाधितांचा नवा उच्चांक

ठळक मुद्दे३ हजार १०४ रुग्ण दवाखान्यात भरती; एकूण रूग्णसंख्या १५ हजारांवर

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनामुळे मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. रविवारी एकाच दिवशी १३ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला, तर काेराेनाबाधितांच्या संख्येनेही रविवारी उच्चांक गाठत एकाच दिवशी ५२४ जण बाधित झाले. २२६ जणांनी काेराेनावर मात केली आहे. 
आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १५ हजार ९ झाली आहे. सध्या ३ हजार १०४ काेराेनाबाधित रुग्णालया उपचार घेत आहेत. जिल्ह्यात एकूण २१३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. रविवारी १३ नवीन मृत्यूमध्ये गडचिराेली जवळील नवेगाव येथील ७२ वर्षीय पुरुष, मुलचेरा येथील ५० वर्षीय महिला, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर येथील ५८ वर्षीय पुरुष, गडचिराेली शहरातील रामनगर येथील ५२ वर्षीय पुरुष, स्नेहनगरातील ५० वर्षीय महिला, सर्वाेदय वाॅर्डातील ६५ वर्षीय पुरुष, भंडारा जिल्ह्यातील  लाखांदूर येथील ५८ वर्षीय पुरुष, देसाईगंज येथील ६२ वर्षीय पुरुष, अहेरी येथील ६९ वर्षीय पुरुष, ५७ वर्षीय पुरुष,  चिमुर येथील ६२ वर्षीय पुरुष, काेरचीतील ४५ वर्षीय पुरुष, भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
नवीन ५२४ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १६९, अहेरी तालुक्यातील ३४, आरमोरी ३८, भामरागड तालुक्यातील १९, चामोर्शी तालुक्यातील ३०, धानोरा तालुक्यातील २७, एटापल्ली तालुक्यातील १६, कोरची तालुक्यातील ३०, कुरखेडा तालुक्यातील ३९, मुलचेरा तालुक्यातील १४, सिरोंचा तालुक्यातील ३०, तर देसाईगंज तालुक्यातील ८८ जणांचा समावेश आहे, तर कोरोनामुक्त झालेल्या २२६ रुग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ११४, अहेरी ११, आरमोरी १६, भामरागड १७, चामोर्शी १५, धानोरा ५, एटापल्ली ९, मुलचेरा ३, सिरोंचा १, कोरची ११, कुरखेडा १३, तसेच देसाईगंज येथील ११ जणांचा समावेश आहे. दिवसेंदिवस काेराेना रूग्णांची संख्या वाढत चालल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.

मृत्यूचे सत्र सुरूच तरीही नागरिक बिनधास्त रस्त्यावर

मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. दरदिवशी १० ते १५ रुग्णांचा मृत्यू हाेत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील विषाणू आक्रमक आहे. त्यामुळे पूर्वीच्या लाटेच्या तुलनेत मृतकांची संख्या आता अधिक आहे. तसेच संसर्ग हाेण्याचे प्रमाणही अधिक आहे. एकाच दिवशी ४०० ते ५०० नागरिक काेराेनाबाधित हाेत आहेत. असे असतानाही नागरिक रस्त्यांवर अनावश्यक फिरत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

 

Web Title: Again 13 people died; New high for carnivores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.