शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
4
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
5
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
7
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
8
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
9
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
10
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
11
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
12
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
13
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध
14
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
15
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
16
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
17
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
18
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
19
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
20
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
Daily Top 2Weekly Top 5

कापणीनंतर पुंजने उभारून ठेवले, रानटी हत्तींनी क्षणांत केली पिकाची राखरांगोळी; खचलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 15:23 IST

आरमोरी तालुक्यातील घटना : पिकाच्या नुकसानीनंतर होते मानसिक तणावात

लोकमत न्यूज नेटवर्कवडधा (गडचिरोली) : वर्षभराच्या परिश्रमाअंती अडीच एकरातील धान कापणी व बांधणीनंतर पुंजणे उभारून ठेवले असतानाच १८ नोव्हेंबरच्या रात्री रानटी हत्तींनी शेतात प्रवेश करून काही क्षणांत पिकाची राखरांगोळी केली. तोंडाशी आलेला घास हिरावल्याने नैराश्येच्या गर्तेत गेलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना आरमोरी तालुक्याच्या देलोडा बु, येथे शनिवार, २२ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजता घडली. खुशाल बैजू पदा (५५) रा. देलोडा (बु.) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

रानटी हत्तींच्या कळपाने १८ नोव्हेंबर रोजी खुशाल पदा यांच्या शेतात धुमाकूळ घालत अडीच एकरातील सर्व धान पुंजणे नष्ट केले. वर्षभर कष्ट करून पिकवलेले पीक काही क्षणात संपल्याने शेतकरी खुशाल पदा नैराश्येच्या गर्तेत गेले. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, घेतलेले कर्ज कसे फेडायचे, पुढचा हंगाम कसा उभा करायचा? या तणावातून ते मानसिकदृष्ट्या खचले. याच नैराश्यातूनच त्यांनी शनिवारी रात्री ११ वाजता विष प्राशन करून आत्महत्या केली, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. रविवारी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. खुशाल पदा यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि तीन मुली आहेत. या घटनेमुळे पदा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पिकांची नासधूस कधी थांबणार? वन विभागाकडून बघ्याची भूमिका

पोर्ला वन परिक्षेत्रात सातत्याने धान व इतर पिकांची नासधूस रानटी हत्तींकडून केली जात आहे. मात्र, वडसा वन विभाग बघ्याची भूमिका घेत आहे. हत्तींचा बंदोबस्त करण्याकडे वन विभाग दुर्लक्ष करत आहे. मागील चार वर्षापासून प्रत्येकच हंगामात हत्तींकडून खुशाल पदा यांच्या पिकाची नासधूस केली जात होती. आतासुद्धा नुकसान झाल्याने नैराश्येतून पदा यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली, असे कुटुंबीयांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Wild elephants destroy crops; despairing farmer commits suicide.

Web Summary : A Gadchiroli farmer, Khushal Pada, committed suicide after wild elephants destroyed his paddy crop ready for harvest. Burdened by debt and crop loss, he ingested poison, highlighting the ongoing human-animal conflict and farmer distress in the region. Negligence by the forest department is alleged.
टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याGadchiroliगडचिरोलीwildlifeवन्यजीवFarmerशेतकरीfarmingशेती