पाण्यासह कूलिंगच्या नावावर शीतपेयांवर आकारला जातोय अतिरिक्त भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 15:53 IST2025-03-04T15:52:53+5:302025-03-04T15:53:54+5:30

Gadchiroli : उन्हाळ्यात नागरिकांची जारच्या पाण्याला पसंती !

Additional charges are levied on soft drinks in the name of cooling with water | पाण्यासह कूलिंगच्या नावावर शीतपेयांवर आकारला जातोय अतिरिक्त भुर्दंड

Additional charges are levied on soft drinks in the name of cooling with water

लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली:
उन्हाळा सुरू झाला असून, तापमानाचा पारा वाढत आहे. तसतशी जारच्या शुद्ध पाण्याला नागरिकांची पसंती अधिक वाढत आहे. दरम्यान पूर्वी फक्त उन्हाळ्यातच शीतपेय विकल्या जायची. मात्र आता वर्षभरही शीतपेय, आईस्क्रीम, पाणी विकल्या जाते. यात विकल्या जाणाऱ्या शीतपेयावर कूलिंग चार्जेसच्या नावाखाली पाच रुपये अतिरिक्त आकारले जात आहे. परिसरासह अहेरी तालुका व उपविभागात शीतपेय विक्रेत्यांकडून सदरचा प्रकार सुरू आहे. यात ग्राहकांना पाच रुपयाचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे.


बदलत्या परिस्थितीनुसार शीतपेयाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. खेड्यापाड्यापर्यंत वाहनांद्वारे शीतपेयाचा पुरवठा केला जातो. विविध कंपन्यांच्या शीतपेयाच्या एजन्सीज स्थानिक परिसरात तयार झाले असल्याने पुरवठा केल्या जात आहे. कोल्ड्रिकच्या लहान बॉटलची किंमत वीस रुपये आहे. शीतपेयाची किंमत शीतपेयाच्या बॉटलवर मुद्रित असते. असे असले तरी कूलिंग चार्जेसच्या नावावर पाच रुपये अतिरिक्त आकारल्या जात आहे.


किती मिळते कमिशन?

  • गेल्या तीन ते चार वर्षांपासून अहेरी उपविभागात पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय वाढला आहे.
  • २०० एमएलपासून चार ते पाच 3 लिटरपर्यंत पिण्याच्या पाण्याच्या बॉटल विकत मिळतात.
  • १००० मिली लिटरची बॉटल २० 3 रुपयांत मिळते. वस्तुस्थितीत ही बॉटल विक्रेत्यांना फक्त आठ रुपये पन्नास पैशात मिळते.
  • एका बॉटलवर तब्बल साडेअकरा रुपये कमिशन स्वरूपात मिळतात. यात विक्रेत्यांना त्यांना फायदा मिळतो.
  • छोट्या स्वरूपाची शीतपेय अधिक विकले जात आहे.


प्रशासनाचे नियंत्रण नाही
शीतपेय, थंडपाणी विक्री व्यवसायावर दराबाबत प्रशासनाचे फारसे नियंत्रण नसल्याचे दिसून येते. अन्न प्रशासन गुणवत्ता तपासते, मात्र दराबाबत संबंधित विभाग लक्ष देत नाही. याबाबत विक्री नियंत्रण अधिकारी रूपचंद फुलझेले यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही. 


ग्रामीण भागात अधिक लूट

  • शीतपेयाची विक्री किराणा दुकानापासून तर लहान मोठ्या दुकानांमध्ये केली जाते. यामुळे या विक्रीवर नियंत्रण ठेवणे सुद्धा कठीण आहे. थंड पाणी व शीतपेय विक्रीच्या व्यवसायात ग्रामीण भागात अधिक पैसे उकडले जात आहेत.
  • गल्लीबोळातील दुकाने सहजपणे एखादा लहान फ्रीज आणून शीतपेय विकू शकतात. कुलिंग चार्जेसच्या नावावर ग्राहकांना होत असलेला अतिरिक्त भुर्दंड थांबविणे सध्या तरी कठीण दिसत आहे.


दुसरा पर्याय नाही
कूलिंग चार्जेसचा मुद्दा कमिशनमधून निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. शीतपेय तयार करणाऱ्या कंपन्या शीतपेय विक्रेत्यांना कमिशन कमी देतात.
शहरापासून तर ग्रामीण भागापर्यंत शीतपेय ही वस्तू गरजेची झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत मागणी होते. विजेचे बिल सुद्धा मोठ्या प्रमाणात येते.
यामुळे कूलिंग चार्जेस घेण्याशिवाय पर्याय नाही असा युक्तिवाद शीतपेय विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.


१ लिटर थंड पाण्याच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह
किंवा दोन लिटरची मोठी बॉटल खरेदी केली, तर पाच रुपये अतिरिक्त देणे ग्राहकांना परवडण्यासारखे आहे. मात्र वीस रुपयांच्या बॉटलवर पाच रुपये अतिरिक्त देणे ग्राहकांच्या जिव्हारी लागत आहे.


 

Web Title: Additional charges are levied on soft drinks in the name of cooling with water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.