शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
5
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
6
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
7
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
8
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
9
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
10
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
11
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
12
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
13
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
14
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
15
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
16
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
17
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
18
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
19
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
20
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला

दोघांची भर, मात्र कोरोबाधितांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 5:00 AM

दरम्यान गुरूवारी धानोरा येथे प्रथमच दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. परंतू ५ लोकांना सुटी झाल्यामुळे आता २३ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केले जात आहे. पाच जणांना सुटी दिल्यानंतर त्यांना त्याबाबतचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते रुग्णालयाच्या आवारातच प्रदान करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हावासीयांना दिलासा : पाच पॉझिटिव्ह रुग्ण उपचारानंतर परतले घरी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या १० दिवसांपासून कोरोनामुळे दहशतीत असलेल्या जिल्हावासियांना गुरूवारी (दि.२८) काहीसा दिलासा मिळाला. सर्वप्रथम कोरोनाबाधित म्हणून दाखल झालेल्या कुरखेडा व चामोर्शी येथील पाच रुग्णांना सुटी देण्यात आली. कोरोनाच्या आजारावर मात केल्यानंतर सुखरूपपणे त्यांना त्यांच्या गावी रवाना करताना अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करून चांगल्या आरोग्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.दरम्यान गुरूवारी धानोरा येथे प्रथमच दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. परंतू ५ लोकांना सुटी झाल्यामुळे आता २३ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केले जात आहे. पाच जणांना सुटी दिल्यानंतर त्यांना त्याबाबतचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते रुग्णालयाच्या आवारातच प्रदान करण्यात आले. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रूडे व इतर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आजारातून बाहेर आलेल्या रूग्णांपैकी कुरखेडा येथील चार तर चामोर्शी येथील एका रु ग्णाचा समावेश होता. हे पाचही रु ग्ण त्यांच्या घरी रु ग्णवाहिकेने रवाना झाले. खबरदारी म्हणून त्यांना पुढील सात दिवस गृह विलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. सात दिवस आरोग्य विभागाकडून त्यांच्या घरीच त्यांच्या लक्षणांबाबत निरीक्षणे नोंदवली जाणार आहेत.गेल्या १८ मे रोजी जिल्ह्यात पहिल्यांदा कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यानंतर सतत ही संख्या वाढत जाऊन २८ वर पोहोचली. आतापर्यंत बाधित रुग्णांमध्ये बहुतांश लोक तरुण वयाचे आहेत. त्यामुळे ते कोरोनावर मात करतील असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला.जिल्ह्यात बाहेरून आलेल्या आपल्याच लोकांना कोरोना संसर्ग झालेला आहे आणि त्यातील रूग्ण बरे होण्यास सुरूवातही झाली आहे. नागरिकांनी न घाबरता बरे होवून गेलेल्या रूग्णांना स्विकारले पाहिजे. आता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे संसर्गाचा धोका राहिलेला नाही. जिल्ह्यातील उर्वरीत २३ रूग्णही लवकरच अशा प्रकारे बरे होवून आपापल्या घरी जातील, हा विश्वास आम्हाला आहे. - दीपक सिंगला, जिल्हाधिकारीरु ग्णालयातून सोडण्यात आलेल्या सर्व रूग्णांना सॅनिटेशन किट व गृह विलगीकरणाच्या किट सोबत देण्यात आल्या आहते. त्यांना आता घरी खबरदारी म्हणून सात दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. त्यांची उपचारादरम्यान रु ग्णालयातील सर्व डॉक्टर इतर कर्मचाºयांनी चांगली काळजी घेतली. सर्व नागरिकांनी आता कोरोना रूग्णांशी नाही तर कोरोना आजाराशी लढाईच आहे. आपला जिल्हा पुन्हा ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करूया.- डॉ.अनिल रूडे, जिल्हा शल्य चिकित्सकसर्वच रुग्णांचा उपचारांना प्रतिसादआता रुग्णालयात उपचार घेत असलेले सर्व २३ रु ग्ण दवाखान्यात उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती चांगली असून त्यांच्या जीवितास सध्यातरी कोणताही धोका नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित काही रुग्ण मृत्यूच्या दाढेत पोहोचले असले तरी गडचिरोली जिल्ह्यात तशी वेळ कोणावर येणार नाही याची काळजी आरोग्य विभाग घेत आहे. यात वृद्ध नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या