शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

गोवारी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा

By admin | Updated: April 6, 2017 01:32 IST

अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे विदर्भात गोंड गोवारी ही जातच अस्तित्वात नाही. प्रत्यक्षात गोवारी हीच जात महाराष्ट्र,

संघर्ष कृती समितीची मागणी : गोंडगोवारी जातच नसल्याचा दावा गडचिरोली : अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे विदर्भात गोंड गोवारी ही जातच अस्तित्वात नाही. प्रत्यक्षात गोवारी हीच जात महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा व मध्यप्रदेशात आहे. गोवारी समाजाची संस्कृती आदिवासी संस्कृतीशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे गोवारी समाजाचा समावेश अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये करण्यात यावा, अशी मागणी आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीच्या वतीने बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. इंग्रजकालीन मेजर ल्युशी स्मिथ सेटलमेंट रिपोर्ट, १९११, १९२१, १९३१ ची जनगणना, १९४१ चा सीपी अ‍ॅण्ड बेरार महसूल विभागाचा आदेश, १९४१ चा सीपी अ‍ॅण्ड बेरार शिक्षण विभागाचा आदेश, १९५० मधील बॅकवर्ड क्लास कमिशन रिपोर्ट दुरूस्ती, १९७९ चे महाराष्ट्र शासनाचे गोपनीय पत्र यामध्ये गोवारी जमातीचा उल्लेख आढळून येतो. १९५३ साली काका कालेलकर आयोग गठीत करण्यात आला. या आयोगाने गोवारी अशीच शिफारस केली होती. मात्र अनुसूचित जमातीच्या यादीत १९५६ रोजी चुकीने गोंडगोवारी अशी संयुक्त नोंद झाली. ती नोंद आजही कायम आहे. १९५६ ला गोंडगोवारी अशी नोंद आल्यानंतर गोवारी जमातीच्या लोकांनी गोंड-गोवारी अशी जात प्रमाणपत्र घेऊन सोयीसुविधा १९८५ पर्यंत घेतल्या. मात्र महाराष्ट्र शासनाने २४ एप्रिल १९८५ मध्ये जीआर काढून दोन गोवारीमध्ये फरक दाखविला. गोवारी व गोंडगोवारी हे वेगळे असल्याचे दाखविण्यात आले. त्यानुसारच १९९४ चा नागपूर येथे हत्याकांडही झाला होता. या हत्याकांडात सुमारे ११४ गोवारी बांधव शहीद झाले. मात्र शासनाने अजूनही दुरूस्ती केली नाही. समाजशास्त्राच्या सिद्धांतानुसार दर २० महिलांवर बोलीभाषा, चालीरिती, रूढी, परंपरा बदलतात. आजपर्यंतच्या कोणत्याही जुन्या दस्तावेजात गोंडगोवारी अशी जात आढळली नाही. गोवारींनाच गोंडगोवारी बोलण्याचा प्रघात आहे. मात्र ती फक्त गोवारी जमातच आहे. चुकीची दुरूस्ती शासनाने करून अनुसूचित जमातीत समावेश करावा, अन्यथा राज्यभरात आणखी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीचे संयोजक क्रिष्णा सर्पा यांनी केली आहे. यावेळी बाजीराम नैताम, दामोधर नेवारे, मोहन सरपे, गजानन कोहळे, हिरासिंग कोराम, हेमंत शेंद्रे, डुकालू वाघाडे, रमेश चामलाटे, धनराज दुधकुवर, श्रावण भोंडे, श्यामराव वाघाडे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)