अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:15 IST2018-12-12T00:14:35+5:302018-12-12T00:15:17+5:30

भामरागड पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम सुरू केली असून अवैध वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करून दंड वसूल केला जात आहे. १८ वर्षाखालील मुलांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही सदर मुले भरधाव वेगात वाहने चालवितात.

Action on illegal transport vehicles | अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई

ठळक मुद्देदंड वसूल : भामरागड पोलिसांची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम सुरू केली असून अवैध वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करून दंड वसूल केला जात आहे.
१८ वर्षाखालील मुलांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही सदर मुले भरधाव वेगात वाहने चालवितात. भामरागड तालुक्यातील काही प्रवाशी वाहने क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करतात. यामुळे प्रवाशांच्या जीवास धोका आहे. तसेच काही चालकांकडे वाहन परवाना राहत नाही. तर काही चालक दारू पिऊन वाहने चालवितात. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे होत नाही. ही बाब लक्षात घेऊन भामरागड पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम हाती घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई केली जात आहे. मोहीम ठाणेदार सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनात पीएसआय झोल, पोलीस शिपाई हितेश्वर बोरकुटे, सचिन शिंदे यांच्यासह इतर पोलीस राबवित आहेत. २

Web Title: Action on illegal transport vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.