लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : घरून बाहेर निघताना प्रत्येकाने मास्क लावणे किंवा रूमाल बांधणे आवश्यक करण्यात आले असले तरी काही वाहनचालक तसेच नागरिक या नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. अशा नागरिकांविरोधात अहेरी पोलिसांनी मोहीम सुरू केली असून नियम न पाळणाऱ्यांना दंड ठोठावला जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच दुकानदारांनी हॅन्डवॉश किंवा सॅनिटायझर ठेवणे आवश्यक आहे. दुकानात, चौकात गर्दी होणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. मात्र खरेदीसाठी बाजारात आलेले नागरिक कुठलीच खबरदारी घेत नसल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे.ही बाब अहेरी पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर अहेरीचे ठाणेदार प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक ए.आर.नरोटे व त्यांच्या पथकाने नियम तोडणाºयांविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. दुकानदार व नागरिकांना प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.
नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST
गडचिरोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच दुकानदारांनी हॅन्डवॉश किंवा सॅनिटायझर ठेवणे आवश्यक आहे. दुकानात, चौकात गर्दी होणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. मात्र खरेदीसाठी बाजारात आलेले नागरिक कुठलीच खबरदारी घेत नसल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई
ठळक मुद्देअहेरीत पोलिसांची मोहीम सुरू : बाहेर निघताना मास्क घालणे झाले अनिवार्य