Gadchiroli Accident: गडचिरोलीत दुचाकीची ट्रॅक्टरला धडक; दोन जण जागीच ठार
By दिगांबर जवादे | Updated: May 11, 2025 22:21 IST2025-05-11T22:19:44+5:302025-05-11T22:21:06+5:30
Gadchiroli Accident: रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला.

Gadchiroli Accident: गडचिरोलीत दुचाकीची ट्रॅक्टरला धडक; दोन जण जागीच ठार
रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची जोरदार धडक बसली. यात दुचाकीस्वार दोन्ही युवक जागीच ठार झाले. हा अपघात ११ मे रोजी दुपारी कुरूड गावाजवळ घडला. प्रतीक नीलकंठ निमसरकार (वय, २६ रा. आष्टी) सचिन विनायक रोहणकर (वय, २५ रा. चामोर्शी) अशी मृत युवकांची नावे आहेत.
प्रतीक व सचिन काही कामानिमित्त गडचिरोली येथे आले होते. काम आटोपून चामोर्शीकडे परत जात हाते. दरम्यान, कुरूड गावाजवळ रस्त्याच्या बाजूला विद्युत साहित्य भरलेला ट्रॅक्टर उभा होता. या ट्रॅक्टरला भरधाव दुचाकीची जबर धडक बसली. यात दुचाकीस्वार प्रतीक व सचिन जागीच ठार झाले. धडक एवढी जबर होती की, दुचाकीचा चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दोघांचेही मृतदेह चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घटनेचा पुढील तपास चामोर्शी पोलिस करीत आहेत.