तिसरी लाट येण्यापूर्वी लसीकरणाचा वेग वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 05:00 AM2021-06-20T05:00:00+5:302021-06-20T05:00:29+5:30

काेरची तहसील कार्यालयात १७ फेब्रुवारीला सभा घेऊन तालुक्यातील काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा तहसीलदारांनी घेतला. कोरची तालुक्यात आतापर्यंत ग्रामीण रुग्णालयामध्ये  १ हजार ३५५ लाेकांनी काेराेना प्रतिबंधक लस घेतली. कोटगूल प्राथमिक आराेग्य केंद्रात ९६९, बोटेकसा आराेग्य केंद्रात २००७ अशा एकूण ४ हजार ३३१ लाेकांनी लसीचा पहिला डोस घेतला. जिल्ह्यात सर्वांत कमी लसीकरण कोरची तालुक्यात झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Accelerate vaccination before the third wave occurs | तिसरी लाट येण्यापूर्वी लसीकरणाचा वेग वाढवा

तिसरी लाट येण्यापूर्वी लसीकरणाचा वेग वाढवा

Next
ठळक मुद्देकाेरची येथे सभा : प्रभारी तहसीलदारांचे प्रतिपादन

लाेकमत न्यूज नेटवर्क
काेरची : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक हाेती. भविष्यात तिसऱ्या लाटेलाही सुरुवात होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वी तालुक्यातील सर्व जनतेने प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. तालुक्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांनीही १०० टक्के लसीकरण कसे करता येईल, याबाबत नागरिकांना जागृत करावे, असे आवाहन प्रभारी तहसीलदार बी. एन. नारनवरे यांनी केले. 
काेरची तहसील कार्यालयात १७ फेब्रुवारीला सभा घेऊन तालुक्यातील काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा तहसीलदारांनी घेतला.            कोरची तालुक्यात आतापर्यंत ग्रामीण रुग्णालयामध्ये  १ हजार ३५५ लाेकांनी काेराेना प्रतिबंधक लस घेतली. कोटगूल प्राथमिक आराेग्य केंद्रात ९६९, बोटेकसा आराेग्य केंद्रात २००७ अशा एकूण ४ हजार ३३१ लाेकांनी लसीचा पहिला डोस घेतला. जिल्ह्यात सर्वांत कमी लसीकरण कोरची तालुक्यात झाल्याचे निदर्शनास आले आहे. लसीकरणाचे प्रमाण कसे वाढविता येईल याबाबत प्रभारी तहसीलदार बी. एन. नारनवरे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. विनोद मडावी, सहायक पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले, नगरपंचायत उपमुख्याधिकारी बाबासो हाक्के यांनी सविस्तर चर्चा केली. सभेला उपस्थित नाबार्ड संस्थेचे संघटक जयस्वाल म्हणाले, गावागावांत जाऊन त्यांच्या स्थानिक भाषेत लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले असून, नागरिकांना लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त केले आहे. सामाजिक कार्यकर्त्या  कुमारी जमकातन यांनीसुद्धा नागरिकांमधील शंकांचे निरसन केले जात असल्याचे सांगितले.

Web Title: Accelerate vaccination before the third wave occurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.