लोकमत न्यूज नेटवर्ककोरची (गडचिरोली) : तालुक्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. कोरची तालुक्यातील बेडगाव पोलिस मदत केंद्रअंतर्गत येणाऱ्या एका गावात तीन वर्षीय चिमुकलीवर ३० वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २८ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.
नरेंद्र हरिदास नंदेश्वर (वय ३०, रा. बेलगाव घाट, ता. कोरची) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, परिसरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. पीडित मुलीचे आई-वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात. घटनेच्या दिवशी मुलीची आई शेतात गेली होती, तर वडील शौचासाठी बाहेर गेले होते. याची संधी साधत आरोपीने चिमुकलीवर अत्याचार केला. ते घरी आले तेव्हा मुलगी रडत होती. मुलीच्या मांडीजवळून रक्त येत असल्याचे दिसले. आरोपीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने आईसमोर रडत रडत गुप्तांगाकडे बोट दाखवले. त्यानंतर आईने तत्काळ आशा वर्कर व पोलिस पाटलांना कळवून बेडगाव पोलिस मदत केंद्रात तक्रार दाखल केली.
तीन दिवसांची पोलिस कोठडी
या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरूद्ध कलम ६४ (२), ६५, भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो अधिनियमातील कलम ४, ६ आणि १२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपीस अटक करून २९ ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांचा पोलिसकोठडी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास कोरची पोलिस ठाण्याचे निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी दिनेश खोटेले आणि महिला उपनिरीक्षक वर्षा बोरसे करत आहेत.
Web Summary : A shocking incident in Gadchiroli's Korchi: a three-year-old girl was sexually assaulted by a 30-year-old man. The accused, Narendra Nandeshwar, has been arrested. The crime occurred when the girl's parents were away. Police are investigating the case, and the accused is in custody.
Web Summary : गढ़चिरोली के कोरची में एक चौंकाने वाली घटना: एक तीन साल की बच्ची पर एक 30 वर्षीय व्यक्ति ने यौन हमला किया। आरोपी, नरेंद्र नंदेश्वर, को गिरफ्तार कर लिया गया है। अपराध तब हुआ जब बच्ची के माता-पिता बाहर गए थे। पुलिस मामले की जांच कर रही है, और आरोपी हिरासत में है।