Gadchiroli | सरपण गाेळा करणाऱ्यासाठी गेलेली व्यक्ती वाघाच्या हल्ल्यात ठार

By गेापाल लाजुरकर | Published: August 29, 2022 01:50 PM2022-08-29T13:50:01+5:302022-08-29T14:07:13+5:30

आरमाेरी तालुक्याच्या शंकरनगर जंगलातील घटना

A person who went to collect firewood was killed in a tiger attack in armori tehsil | Gadchiroli | सरपण गाेळा करणाऱ्यासाठी गेलेली व्यक्ती वाघाच्या हल्ल्यात ठार

Gadchiroli | सरपण गाेळा करणाऱ्यासाठी गेलेली व्यक्ती वाघाच्या हल्ल्यात ठार

googlenewsNext

आरमोरी (गडचिराेली) :  सरपणासाठी लाकडे आणण्यासाठी जंगलात गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना सोमवार २९ ऑगस्ट राेजी सकाळी ८ वाजता आरमाेरी तालुक्याच्या शंकरनगर जंगलात घडली. बळीराम शिवराम कोलते (४७) रा. सालमारा, असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

आरमोरी तालुक्याच्या सालमारा येथील बळीराम कोलते हे सरपणासाठी लाकडे आणण्यासाठी जोगीसाखरा जवळील  शंकरनगर नाल्यालगत कक्ष क्रमांक ४७ राखीव जंगलात आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत सकाळी गेले होते. लाकडे जमा करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने बळीरामवर हल्ला करून त्याला ठार केले. घटनेची माहिती सहकाऱ्यांनी गावात दिली. ही माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वारंवार मागणी करूनही वाघांचा बंदाेबस्त हाेत नसल्याने नागरिकांनी राेष व्यक्त केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.

तालुक्यात आठ महिन्यात ७ बळी

आरमाेरी तालुक्यात गेल्या आठ महिन्यात वाघांच्या हल्ल्यात ७ लाेकांचा बळी गेला. यामध्ये कुरंझा, अरसाेडा, आरमाेरी, इंजेवारी, बाेरीचक, शिवणी बु. व सालमारा येथील इसमाचा व्याघ्रबळीमध्ये समावेश आहे. यापैकी शिवणी बु. येथील शेतकऱ्याला चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील त्याच्या शेतात काम करीत असताना वाघाने हल्ला करून ठार केले हाेते.

Web Title: A person who went to collect firewood was killed in a tiger attack in armori tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.