शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगड सीमेवर एका नक्षल्याचा खात्मा ! नक्षलवाद्यांचे दोन तळ जवानांनी केले उद्ध्वस्त; एक जवान जखमी

By संजय तिपाले | Updated: February 5, 2026 20:41 IST

Gadchiroli : नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात घुसून सी-६० च्या जवानांनी पुन्हा एकदा आपल्या शौर्याचा परिचय दिला. भामरागड उपविभागातील छत्तीसगड सीमेलगतच्या घनदाट जंगलात झालेल्या भीषण चकमकीत ५ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी एका नक्षलवाद्याला कंठस्नान घातले.

​लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात घुसून सी-६० च्या जवानांनी पुन्हा एकदा आपल्या शौर्याचा परिचय दिला. भामरागड उपविभागातील छत्तीसगड सीमेलगतच्या घनदाट जंगलात झालेल्या भीषण चकमकीत ५ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी एका नक्षलवाद्याला कंठस्नान घातले. या कारवाईत नक्षलवाद्यांचे दोन मोठे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. दरम्यान, नक्षल्यांच्या भ्याड गोळीबारात सी-६० चा एक जवान जखमी झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ३ फेब्रुवारीच्या संध्याकाळी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, नक्षलवाद्यांच्या 'कंपनी क्रमांक १०' आणि छत्तीसगडमधील एका दलमचे सदस्य फोदेवाडा जंगल परिसरात मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहेत. ही माहिती मिळताच विलंब न लावता भामरागडच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सी-६० च्या १४ पथकांनी रात्रीच्या अंधारातच जंगलाला वेढा टाकला.  ४ रोजी दिवसा झालेल्या पहिल्या चकमकीत जवानांनी आक्रमक पवित्रा घेत नक्षलवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले. मात्र, घनदाट झाडीचा फायदा घेत नक्षलवादी पसार झाले. ५ रोजी  सकाळी पुन्हा मोहिमेला धार चढवण्यासाठी अतिरिक्त ४ पथके आणि सीआरपीएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आले.  दुपारी जवानांना एका नक्षल्याचा मृतदेह सापडला असून, त्याच्याजवळ जप्त केलेली शस्त्रे पाहता तो मोठा कमांडर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

​जवान जखमी, हेलिकॉप्टरने हलविले

​संध्याकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी पुन्हा गोळीबार सुरू केला, ज्यामध्ये सी-६० चा एक जवान गोळी लागून जखमी झाला. जखमी जवानाला तातडीने हेलिकॉप्टरने उपचारासाठी हलवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिस दलाने स्पष्ट केले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Naxalite Killed on Chhattisgarh Border; Camps Destroyed, Soldier Injured

Web Summary : C-60 forces neutralized a Naxalite near the Chhattisgarh border, destroying two camps. A soldier was injured in the exchange. The operation, launched after intelligence on Naxalite activity, involved multiple teams and CRPF support. The injured soldier is stable, and anti-Naxal operations are intensified.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली