९३ हजारांच्या दंडाची कारवाई

By Admin | Updated: June 19, 2014 23:50 IST2014-06-19T23:50:00+5:302014-06-19T23:50:00+5:30

चामोर्शी उपविभागातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. ९३ हजार रूपयांचा दंड मे महिन्यातील कारवाईतून करण्यात आला आहे.

9 3 thousand fine punishments | ९३ हजारांच्या दंडाची कारवाई

९३ हजारांच्या दंडाची कारवाई

चामोर्शी : चामोर्शी उपविभागातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. ९३ हजार रूपयांचा दंड मे महिन्यातील कारवाईतून करण्यात आला आहे. या दंडाची रक्कम वसूल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती तहसीलदार एस.टी. खंडारे यांनी दिली आहे.
चामोर्शी तालुक्यात महसूल उपविभागाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करण्यात येत होती. त्यानुसार सर्व मंडळ अधिकारी व तहसीलदार चामोर्शी यांनी गौण खनिज उत्खनन परवानाधारकांची तपासणी करून दंडात्मक कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी देवेंंद्रसिंह यांच्या निर्देशानुसार महसूल प्रशासनाने तळोधी मोकासा येथील नीलकंठ मनोहर कुनघाडकर यांच्याकडे ५८ हजार विटा हे गौण खनिज सापडले. त्यांच्यावर २५ हजार रूपये दंडाची कारवाई मे महिन्यात करण्यात आली. तसेच सुनिल नीलकंठ चलाख तळोधी मोकासा यांच्याकडेही ५८ हजार विटा आढळल्या. त्यांच्यावरही २५ हजार रूपयाच्या दंडाची कारवाई करण्यात आली. तसेच चामोर्शी येथील पत्रू किसन सोरते यांच्याकडे ५७ हजार विटा आढळून आल्या. त्यांच्यावरही २५ हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तळोधी येथील अशोक विठोबा संतोषवार यांच्याकडे १८ हजार विटा हे गौण खनिज आढळून आले. त्यांच्यावर १८ हजार रूपयांचा दंड करण्यात आला आहे. लखमापूर बोरी येथील गुरूदेव चापले यांनी स्वत:च्या मालकीच्या ट्रॅक्टरने एकोडी येथील नदीघाटावर अवैध उत्खनन सुरू केले होते. ६ मे २०१४ ला सकाळी ५.३० वाजता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. गुरूदेव चापले हे अहोरात्र विनापरवाना अवैध उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवित होते. त्यानुसार त्यांच्यावर तहसीलदार चामोर्शी यांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
यासंदर्भात तहसीलदार एस. टी. खंडारे यांना विचारणा केली असता, ९० हजार रूपयाचा दंड आकारण्यात आला आहे. शेती हंगामात ट्रॅक्टर मालकाचे नुकसान होऊ नये म्हणून ट्रॅक्टर परत करण्यात आला. दंडात्मक कारवाईची वसुली अद्याप बाकी आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शासनाच्या स्वामीत्व धनाची अवैधरित्या साठवणूक अथवा वाहतूक याला आळा घालण्याकरिता चामोर्शी उपविभागात धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. अवैध गौण खनिजाची चोरी करण्यास मनाई करण्यात आली असून यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे व अशी मंडळी शासनाविरूद्ध लोकांमध्ये भ्रम पसरविण्याचे काम करीत आहे. यापुढेही अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरूच राहील. दंडात्मक तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 9 3 thousand fine punishments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.