शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

८५१६ रूग्ण मलेरिया ‘पॉझिटिव्ह’

By admin | Updated: November 19, 2014 22:38 IST

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून मलेरियाने थैमान घातले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व रूग्णालय रूग्णांनी हाऊसफुल असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे जानेवारी ते आॅक्टोबर २०१४

१० महिन्यांत : सर्वाधिक रूग्ण एटापल्ली व धानोरा तालुक्यातगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून मलेरियाने थैमान घातले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व रूग्णालय रूग्णांनी हाऊसफुल असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे जानेवारी ते आॅक्टोबर २०१४ या दहा महिन्यात जिल्ह्यात तब्बल ८ हजार ५१६ रूग्ण मलेरिया पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने हिवतापाच्या साथीला नियंत्रणात आणण्यासाठी वर्षभर कार्यक्रम राबविल्या जातो. मात्र गडचिरोली जिल्ह्यात जंगल, नदी, नाले, डबके आदींचे प्रमाण अधिक असल्याने जिल्ह्यातील वातावरण हिवतापाचे जंतू निर्माण करण्यासाठी अनुकूल असल्याचे समजले जाते. मात्र या जिल्ह्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने बाराही तालुक्यात जानेवारी ते ३१ आॅक्टोबर २०१४ या कालावधीत ५ लाख २४ हजार ६७४ नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले. यापैकी ८ हजार ५१६ रूग्ण मलेरिया पॉझिटीव्ह आढळून आले. या रूग्णांमध्ये पीव्ही स्वरूपाचे १ हजार ३३३ तर पीएफ स्वरूपाचे ७ हजार १८३ रूग्णांचा समावेश आहे. जानेवारी ते आॅक्टोबर २०१३ या कालावधीत जिल्हा हिवताप विभागाच्यावतीने एकूण ७२ हजार ३१८ रूग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले होते. यापैकी पीव्ही स्वरूपाचे १९१ व पीएफ स्वरूपाचे १ हजार ८३३ असे एकूण २ हजार २४ मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळले होते. त्यापूर्वी जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने एकूण ५३ हजार ६६४ रूग्णांचे रक्त नमुने घेऊन तपासणी करण्यात आली होती. यामध्ये पीव्ही स्वरूपाचे १२८, पीएफ स्वरूपाचे ३९२ असे एकूण ५२० पॉझिटीव्ह मलेरिया रूग्ण आढळून आले होते. या दोनही तपासणीच्या तुलनेत यंदा जानेवारी ते आॅक्टोबर २०१४ मध्ये मोठ्या प्रमाणात मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याने आरोग्य विभागालाही ही साथ आटोक्यात आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.जानेवारी ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत अहेरी तालुक्यातील एकूण ४० हजार ११३ रूग्णांचे रक्त नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. यात पीव्ही स्वरूपाचे १५७ व पीएफ स्वरूपाचे ७३० असे एकूण ८८७ मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. आरमोरी तालुक्यात ४० हजार ७६७ रक्त नमुन्यांमध्ये पीव्ही स्वरूपाचे २५ व पीएफ स्वरूपाचे ११९ असे एकूण १४४ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. एटापल्ली तालुक्यात ४२ हजार ९७३ नमुने घेण्यात आले. यापैकी पीव्ही स्वरूपाचे २५५ व पीएफ स्वरूपाचे १ हजार ७०२ असे एकूण १ हजार ९५७ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. भामरागड तालुक्यात २५ हजार ७९८ रक्त नमुन्याची तपासणी करण्यात आली. यात पीव्ही प्रकारचे १०० व पीएफ प्रकारचे १ हजार १२३ असे एकूण १ हजार २२३ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. चामोर्शी तालुक्यात ६९ हजार ३९ रक्त नमुन्यांपैकी पीव्ही प्रकारचे १४३ व पीएफ प्रकारचे ३२१ असे एकूण ४६४ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. धानोरा तालुक्यात ६९ हजार ७१७ नमुन्यांपैकी पीव्ही प्रकारचे १६७ व पीएफ प्रकारचे १ हजार ३६७ असे एकूण १ हजार ५३४ रूग्ण मलेरिया पॉझिटीव्ह आढळून आले. गडचिरोली तालुक्यात ५६ हजार ८८९ रक्त नमुने घेण्यात आले. यामध्ये पीव्ही प्रकारचे ९० व पीएफ प्रकारचे ३६५ असे एकूण ४५५ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. कोरची तालुक्यात ३० हजार ९६२ रक्त नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. यात पीव्ही प्रकारचे १२, पीएफ प्रकारचे २७९ असे एकूण २९१ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. कुरखेडा तालुक्यात ६० हजार ९८ रक्त नमुने घेण्यात आले. यामध्ये पीव्ही प्रकारचे ७३ व पीएफ प्रकारचे ४६२ असे एकूण ५३५ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले.मुलचेरा तालुक्यात २४ हजार ६५४ रक्त नमुने घेण्यात आले. यामध्ये पीव्ही प्रकारचे ७४ व पीएफ प्रकारचे २६१ असे एकूण ३३५ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. सिरोंचा तालुक्यात ३८ हजार ६०३ रक्त नमुन्यांमध्ये पीव्ही प्रकारचे २२७ व पीएफ प्रकारचे ४३१ असे एकूण ६५८ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. देसाईगंज तालुक्यात ४३ हजार ५२९ रक्त नमुन्यांमध्ये पीव्ही प्रकारचे १० व पीएफ प्रकारचे २३ असे एकूण ३३ रूग्ण मलेरियाने पॉझिटीव्ह आढळून आले. मलेरियाच्या थैमानामुळे नागरिक भयभीतही झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)