२४ तासात ८५ रूग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:00 AM2020-08-01T05:00:00+5:302020-08-01T05:00:47+5:30

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या ५७७ कोरोना बाधितांमधील ७५ टक्के म्हणजेच ४२७ रूग्ण यशस्वीरीत्या कोरोनामुक्त झाले आहेत. १४९ कोरोनाबाधितांवर दवाख्यान्यात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये कुरखेडा आणि गडचिरोली तालुक्यातील प्रत्येकी दोन जणांचा समावेश असून इतर सर्वजण एसआरपीएफ जवान आहेत.

85 patients coronary free in 24 hours | २४ तासात ८५ रूग्ण कोरोनामुक्त

२४ तासात ८५ रूग्ण कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देअ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या १४९ : आतापर्यंत ७५ टक्के बाधित लोकांनी केली कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या महिनाभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढल्याने जिल्हावासियांची चिंता काहीशी वाढली असताना शुक्रवारी सायंकाळपर्यंत २४ तासात ८५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आता अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा झपाट्याने कमी होऊन तो १४९ वर उतरला आहे.
दरम्यान गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयातील एक नर्स आणि जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती झालेला एक जण कोरोनाबाधित आढळून आला आहे. सदर रूग्णांचा संपर्क तपशील घेणे सुरू असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या ५७७ कोरोना बाधितांमधील ७५ टक्के म्हणजेच ४२७ रूग्ण यशस्वीरीत्या कोरोनामुक्त झाले आहेत. १४९ कोरोनाबाधितांवर दवाख्यान्यात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये कुरखेडा आणि गडचिरोली तालुक्यातील प्रत्येकी दोन जणांचा समावेश असून इतर सर्वजण एसआरपीएफ जवान आहेत.
अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधितांमध्ये सुरक्षा दलाचे ११८ आणि ३१ इतर रूग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयातील रुग्णांना निरोप देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी किनलाके, अधिसेविका अनिता निकोडे उपस्थित होते.

दुकानांची वेळ संध्याकाळी ७ पर्यंत वाढविली
जिल्ह्यात १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट हा संपूर्ण महिना लॉकडाऊन राहणार आहे. मात्र आतापर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत असलेली दुकाने उघडे ठेवण्याची वेळ आता सायंकाळी ७ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहेत. याशिवाय अधिकृत परवाना घेऊन आंतरराज्य, राज्यांतर्गत व आंतरजिल्हा प्रवासास मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या बाहेर प्रवास करण्यासाठी आॅनलाईन माहिती भरून ई-पास घेणे आवश्यक आहे. त्याचा वापर योग्यरित्या आणि अतिमहत्वाच्या कामासाठीच करणे अपेक्षित आहे. जिल्ह्याबाहेरून सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेऊन गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाºया व्यक्तींना आरोग्य विभागाकडून दिलेल्या निर्देशानुसार १४ दिवस गृहविलगीकरण किंवा संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे.
दि. १ ऑगस्टपासून सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहणार असून रविवारी मात्र सर्व दुकाने बंद राहतील. तसेच खते, कीटकनाशके आणि बी-बीयाणे यांच्याशी निगडीत उत्पादन व पॅकजिंग आणि किरकोळ विक्र ीसंबंधित उद्योग, दुकाने सर्व दिवस सुरु राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक सिंगला यांनी कळविले.

Web Title: 85 patients coronary free in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.