शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
4
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
5
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
6
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
7
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
8
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
9
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
10
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
11
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
13
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
14
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
15
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
16
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
17
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
18
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
19
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
20
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका

७०० लिटर मोहफूल सडवा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 1:38 AM

धानोरा पोलिसांनी झेंडेपार येथे धाड टाकून १५० लीटर मोहफुलाची दारू, ७०० लीटर सडवा व २० रिकामे ड्राम जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देझेंडेपार येथे कारवाई : तीन आरोपींना अटक, इतर साहित्यही जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : धानोरा पोलिसांनी झेंडेपार येथे धाड टाकून १५० लीटर मोहफुलाची दारू, ७०० लीटर सडवा व २० रिकामे ड्राम जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.झेंडेपार येथील जंगल परिसरात मोहफुलाची दारू काढली जात असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशनचे प्रभारी सुरेश साळुंके व पोलीस उपनिरीक्षक हिंमतराव सरगर तसेच बिट अंमलदार उराडे, पोलीस शिपाई चुनारकर, कृपाकर, गावडे, सानिया एकले यांच्या पथकाने दारूभट्टीवर धाड टाकली. दारूभट्टीवरून दारू काढण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी श्रीराम सोमा नरोटे, सुरेश श्रीराम नरोटे व राहुल श्रीराम नरोटे तिघेही रा.झेंडेपार यांना अटक केली आहे. इतर कोणी दारू काढत असेल तर याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस