७०० लिटर मोहफूल सडवा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 01:44 IST2018-08-08T01:38:14+5:302018-08-08T01:44:17+5:30
धानोरा पोलिसांनी झेंडेपार येथे धाड टाकून १५० लीटर मोहफुलाची दारू, ७०० लीटर सडवा व २० रिकामे ड्राम जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

७०० लिटर मोहफूल सडवा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : धानोरा पोलिसांनी झेंडेपार येथे धाड टाकून १५० लीटर मोहफुलाची दारू, ७०० लीटर सडवा व २० रिकामे ड्राम जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
झेंडेपार येथील जंगल परिसरात मोहफुलाची दारू काढली जात असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशनचे प्रभारी सुरेश साळुंके व पोलीस उपनिरीक्षक हिंमतराव सरगर तसेच बिट अंमलदार उराडे, पोलीस शिपाई चुनारकर, कृपाकर, गावडे, सानिया एकले यांच्या पथकाने दारूभट्टीवर धाड टाकली. दारूभट्टीवरून दारू काढण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी श्रीराम सोमा नरोटे, सुरेश श्रीराम नरोटे व राहुल श्रीराम नरोटे तिघेही रा.झेंडेपार यांना अटक केली आहे. इतर कोणी दारू काढत असेल तर याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.