७९ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शनावर

By Admin | Updated: June 26, 2014 23:13 IST2014-06-26T23:13:25+5:302014-06-26T23:13:25+5:30

नक्षल समस्येने त्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील मोठ्या शहरांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभाग व गृह विभाग यांच्या संयुक्त

7 9 students see Maharashtra | ७९ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शनावर

७९ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शनावर

पोलीस विभागाचा पुढाकार : नक्षल्यांच्या कुटुंबातील सदस्यही सहलीत सहभागी
गडचिरोली : नक्षल समस्येने त्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील मोठ्या शहरांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभाग व गृह विभाग यांच्या संयुक्त उपक्रमातून महाराष्ट्र दर्शन या सहलीचे आयोजन गतवर्षीपासून केल्या जात आहे. आज गडचिरोली पोलीस मुख्यालयातून या वर्षीच्या पाचव्या टप्प्याला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. १० दिवशीय सहलीत ७९ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यामध्ये नक्षल पीडित तसेच नक्षलवाद्यांच्या कुटुंबियांच्याही सदस्यांचा समावेश आहे.
आदिवासी विकास विभाग व पोलीस विभागाच्या पुढाकाराने आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नक्षली सदस्यांचे तसेच नक्षल पीडितांचे मुले-मुली सहलीत सहभागी झाले आहेत. यात आत्मसमर्पित नक्षलवादी जानकी तिम्माचा भाऊ विकास तिम्मा रा.होडरी, आत्मसमर्पित नक्षली विजय गावडे याची पुतणी रजनी गावडे, प्लाटून एक सेक्शनच्या सदस्य दशरथ कोडवे याचा पुतण्या शिवलाल हरमे, देवरी दलमचा कमांडर रामदास हलामीची पुतणी रोशनी हलामी आदी सहभागी झाले आहेत. दरम्यान नक्षली सदस्यांच्या कुटुुंबिय विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मुंबई व पुणे या मोठ्या शहरांसह महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक स्थळांविषयही माहिती जाणून घेण्याची जी संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करण्याचा मानस सहलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला. सहलीत ५ नक्षली सदस्यांचे नातेवाईक विद्यार्थी तसेच नक्षल पीडित कुटुुंबातील ९ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमादरम्यान रोशनी हलामी व मंगेश मडावी या विद्यार्थ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्या हस्ते पुस्तके वितरीत करण्यात आले.दरम्यान राजकुमार शिंदे यांनीही मार्गदर्शन उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सहलीचा प्रारंभ पोलीस मुख्यालयातून करण्यात आला. सहलीचा समारोपीय कार्यक्रम जिल्हा पोलीस मुख्यालयात ५ जुलै रोजी होणार आहे.
कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक सुवेज हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, आदिवासी विभागाचे नियोजन अधिकारी डी. बी. खडतकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पोलीस विभागाचे जनसंपर्क अधिकारी प्रविण निंबाळकर तर आभार पोलीस उपअधीक्षक (गृह) डी. बी. इलमकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 7 9 students see Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.