शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

६२.८८ टक्के मतदान

By admin | Updated: July 1, 2015 01:50 IST

चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने मंगळवारी

दुर्गापूर पं.स. गणाची निवडणूक : गुरूवारी दोन उमेदवारांचा फैसलाचामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने मंगळवारी १२ मतदान केंद्रांवरून सकाळी ७.३० ते ३ या वेळेत मतदान प्रक्रिया घेण्यात आली. पं.स. गणाच्या या पोटनिवडणुकीत एकूण ६२.८८ टक्के मतदान झाले. चोख पोलीस बंदोबस्तात, शांततेत मतदानांची प्रक्रिया पार पडली.दुर्गापूर पं.स. गणाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीतर्फे रमेश दुर्गे व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पिरिपा समर्थीत निनाद वासुदेव देठेकर हे दोन उमेदवार उतरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून यापूर्वी निवडून आलेले पं.स. सदस्य नेताजी तुरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दुर्गापूर पं.स. गणासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. सुरूवातीला या पोटनिवडणुकीसाठी सहा उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. मात्र नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपाचे रमेश दुर्गे व काँग्रेस-राकाँ व पिरिपा समर्थीत निनाद देठेकर यांच्यात थेट लढत झाली. दुर्गापूर पं.स. गणामध्ये ३ हजार ६६३ पुरूष व ३ हजार ३९२ महिला असे एकूण ७ हजार ५५ मतदार संख्या आहे. मंगळवारी सकाळी ७.३० ते ३ या वेळेत २ हजार २९१ पुरूष व २ हजार १४५ महिला अशा एकूण ४ हजार ४३६ मतदारांनी १२ मतदान केंद्रांवरून उत्स्फुर्तपणे मतदान केले. चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपाडे, नायब तहसीलदार निवडणूक, एस. के. चडगुलवार व नायब तहसीलदार देवेंद्र दहीकर यांनी विविध केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेची स्थिती जाणून घेतली. दुर्गापूर पं.स. निर्वाचन गणासाठी झालेल्या पोट निवडणुकीची मतमोजणी २ जुलै रोजी गुरूवारला चामोर्शी तहसील कार्यालयाच्या परिसरात करण्यात येणार आहे. बाराही मतदान केंद्रांवरील पोलिंग पार्ट्या चोख पोलीस बंदोबस्तात चामोर्शीच्या तहसील कार्यालयात दाखल झाल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)