खरीपात ६० टक्के कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 06:00 AM2019-11-07T06:00:00+5:302019-11-07T06:00:21+5:30

यावर्षी जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामासाठी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. हे उद्दीष्ट ६०.३६ टक्के गाठण्यात आले. २३ हजार २५६ शेतकऱ्यांना ९५ कोटी १९ लाखांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यात सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले. या बँकेने ५५ कोटी ७५ लाखांच्या कर्जवाटपाच्या उद्दीष्टापैकी ५१ कोटी ७९ लाखांचे कर्जवाटप केले.

60% loan purchase | खरीपात ६० टक्के कर्जवाटप

खरीपात ६० टक्के कर्जवाटप

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीयीकृत बँका माघारल्या : जिल्हा बँकेने गाठले ९२.९० टक्के उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी सहकार विभागाने ठरवून दिलेले पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ६०.३६ टक्के गाठण्यात बँकांना यश आले. ३१ ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवाटपाचे केवळ ४०.४० टक्के उद्दिष्ट गाठले तर जिल्हा सहकारी बँकेने सर्वाधिक ९२.९० टक्के कर्जवाटप करून याही वर्षी आघाडी घेतली आहे.
यावर्षी जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामासाठी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. हे उद्दीष्ट ६०.३६ टक्के गाठण्यात आले. २३ हजार २५६ शेतकऱ्यांना ९५ कोटी १९ लाखांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यात सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले. या बँकेने ५५ कोटी ७५ लाखांच्या कर्जवाटपाच्या उद्दीष्टापैकी ५१ कोटी ७९ लाखांचे कर्जवाटप केले. हे कर्ज १६ हजार ५३ शेतकऱ्यांना देण्यात आले.
राष्ट्रीयीकृत बँकांना ७७ कोटी ६७ लाखांचे कर्जवाटपाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी ३१ कोटी ७१ लाख वाटप झाले. हे कर्ज ५३६८ शेतकºयांना देण्यात आले. अ‍ॅक्सिस व आयसीआयसीआय या खासगी बँकांनी तर शेतकऱ्यांना जेमतेम १६.१६ टक्केच कर्जवाटप केले. त्यांनी अवघ्या सात शेतकऱ्यांना ३२ लाखांचे पीक कर्ज दिले. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने १८३५ शेतकºयांना ११ कोटी ६९ लाखांचे कर्जवाटप करत ५३.६९ टक्के उद्दीष्ट गाठले आहे.
रबी हंगामासाठी यावर्षी जिल्ह्यातील सर्व बँकांना मिळून २३ कोटी १८ लाखांचे उद्दीष्ट दिले आहे. हे उद्दीष्ट कोणत्या बँका किती प्रमाणात गाठतात याकडे शेतकरी व सहकार विभागाचे लक्ष लागले आहे.

पाच हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
कर्जमाफीची घोषणा होऊन दोन वर्षे झाली तरी अजून ५ हजार पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. जिल्ह्यात ४० हजार ४०० शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविले आहे. त्यापैकी ३५ हजार ३३१ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून उर्वरित शेतकरी प्रतीक्षेत आहेत. प्राप्त माहितीनुसार, कर्जमाफीसाठी पुरेसा निधी सध्या सरकारकडे नाही. बँकांनी त्यासंबंधीचे पत्र सरकारकडे पाठविले आहे. परंतू निधीअभावी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकलेला नाही.

गेल्यावर्षीपेक्षा कर्जवाटपात घट
गेल्यावर्षीच्या कर्जमाफीनंतर यावर्षी कर्जाचे प्रमाण वाढण्याऐवजी कमी झाले. कर्जवाटपाचे लक्ष्यच कमी देण्यात आल्याने वाटपही घटले. गेल्यावर्षीच्या खरीप हंगामासाठी २०२ कोटी ९१ लाख कर्जवाटपाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ५२.५६ टक्के उद्दीष्ट गाठत २५ हजार ५४१ शेतकऱ्यांना १०६ कोटी ६४ लाखांचे कृषी कर्ज वाटण्यात आले.
यावर्षी मात्र कर्जवाटपाचे लक्ष्य घटवून १५७ कोटी ७० लाख केले होते. त्यापैकी ६०.३६ टक्के लक्ष्य गाठत ९५ कोटी १९ लाखांचे कर्ज वाटण्यात आले. कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही कमी होऊन २३ हजार २५६ वर आली आहे.

Web Title: 60% loan purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.