५५ नवीन बाधित तर २६ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 05:00 IST2020-09-19T05:00:00+5:302020-09-19T05:00:27+5:30
शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या २६ रुग्णांमध्ये गडचिरोलीतील १४, चामोर्शी १, भामरागड १, कोरची ३, अहेरी २ आणि देसाईगंज येथील ५ जणांचा समावेश आहे. नव्याने समाविष्ठ झालेल्या ५५ बाधितांमध्ये गडचिरोलीतील २४, देसाईगंज येथील ७, चामोर्शी २, आरमोरी ३, धानोरा २, कोरची २, मुलचेरा १, कुरखेडा २, सिरोंचा ४, अहेरी २ आणि एटापल्लीतील ६ जणांचा समावेश आहे.

५५ नवीन बाधित तर २६ कोरोनामुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात आज २६ जण कोरोनामुक्त झाले असताना नवीन ५५ बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील क्रियाशिल कोरोनारुग्णांची संख्या ५६५ झाली आहे. देसाईगंज येथील एका महिला कोरोनारुग्णाच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी घेण्यात आली. त्यामुळे एकूण मृत्यूसंख्या ८ वर पोहोचली आहे.
आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ८९६ वर गेली असून पुढील दोन दिवसात दोन हजारांचा पल्ला गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी १ हजार ३२३ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.
शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या २६ रुग्णांमध्ये गडचिरोलीतील १४, चामोर्शी १, भामरागड १, कोरची ३, अहेरी २ आणि देसाईगंज येथील ५ जणांचा समावेश आहे. नव्याने समाविष्ठ झालेल्या ५५ बाधितांमध्ये गडचिरोलीतील २४, देसाईगंज येथील ७, चामोर्शी २, आरमोरी ३, धानोरा २, कोरची २, मुलचेरा १, कुरखेडा २, सिरोंचा ४, अहेरी २ आणि एटापल्लीतील ६ जणांचा समावेश आहे.
नवीन बाधित गडचिरोलीच्या रुग्णांमध्ये सोनापूर कॉम्प्लेक्सचे ३, गोकुळनगर ३, धुंडेशिवणी, पार्डी कुपी, हनुमान वार्ड, सुयोगनगर नवेगाव, रामपुरी वार्ड, महिला महाविद्यालय, सी-६० जवान, वनश्री कॉलनी, जिल्हा रूग्णालय, रामनगर वार्ड नं.८, सद्गुरू नगर नगर परिषदजवळ, आनंद नगर, सेमाना रस्ता, तसेच ब्रह्मपुरी व मूल येथील रुग्ण आहेत. देसाईगंज येथील ७ जणांमध्ये एसआरपीएफ ७, अहेरी २, सिरोंचा ४ यात आरोग्य कर्मचारी २, इतर २, आरमोरी ३, चामोर्शी २, हनुमान वार्ड १, येनापूर १, धानोरा येथील सीआरपीएफ २, एटापल्लीच्या ६ मध्ये सीआरपीएफ ४, आरोग्य कर्मचारी १, तसेच कोरची येथील २, मुलचेरा १ व कुरखेडा येथील २ जणांचा समावेश आहे.
७३ टक्के पुरूष तर २७ टक्के महिला बाधित
जिल्ह्यात आतापर्यंत प्रतिलक्ष ३ हजार ९९७ तपासण्या केल्या गेल्या. त्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट ४.२९ टक्के तर निगेटिव्ह रेट ९४.७१ टक्के आहे. पुरुष ७३ टक्के तर महिलांचे प्रमाण २७ टक्के आहे. सद्या ५३७ क्रियाशिल रुग्ण असून त्यांची टक्केवारी एकूण बाधितांच्या २९ टक्के आहे. मृत्यू ८ असून त्याची टक्केवारी ०.४३ म्हणजे आर्ध्या टक्क्याहून कमी आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी मृत्यूदर गडचिरोलीत आहे. चाचण्यांच्या बाबतीतही जिल्हा आघाडीवर आहे. डबलिंग रेट जिल्ह्यात १७.९ असून या महिन्यात रुग्ण वाढल्याने प्रतिदिन ४० च्या प्रमाणात संख्या वाढत आहे.
जनता कर्फ्यू करणार की नाही?
जिल्ह्याच्या सर्व भागात नाही तरी किमान शहराच्या हद्दीत ‘जनता कर्फ्यू’ पाळून कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्याची गरज आहे. अनेक दुकानदार त्याबाबतची प्रतीक्षा करत आहेत. मात्र त्यासाठी कोणीच पुढाकार घेताना दिसत नाही. काही व्यापाऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. मात्र अद्याप जनता कर्फ्यूसंदर्भात निर्णय झालेला नाही.