शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आरमाेरीत 52 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:01 IST

मतदानाला आता १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामविकासाचा महत्त्वाचा कणा म्हणून ग्रामपंचायतकडे बघितले जाते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्येसुद्धा पॅनल लढविले जात आहेत. अनेक पॅनल राजकीय पक्षांचे आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय पक्षापेक्षा उमेदवार बघून मतदान केले जात हाेते.

ठळक मुद्दे१५ ला निवडणूक : पॅनलमुळे ग्रामपंचायतीसाठी रंगत वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कआरमाेरी : तालुक्यात २९ ग्रामपंचायतींच्या २६३ जागांसाठी मतदान हाेणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण ५२ हजार ६०४ मतदार आहेत. ९४ मतदान केंद्रांवरून मतदान हाेणार आहे. आरमाेरी तालुक्यात ३० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला हाेता. मात्र, नरचुली ग्रामपंचायतीचे विभाजन हाेऊन जांभळी ही नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात येणार असल्याने नरचुली ग्रामपंचायतीची निवडणूक आयाेगाने रद्द केली आहे. त्यामुळे आता १५ जानेवारीला २९ ग्रामपंचायतींच्या २६३ जागांसाठी मतदान हाेणार आहे. १४६ जागा महिलांकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मतदानाला आता १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामविकासाचा महत्त्वाचा कणा म्हणून ग्रामपंचायतकडे बघितले जाते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्येसुद्धा पॅनल लढविले जात आहेत. अनेक पॅनल राजकीय पक्षांचे आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय पक्षापेक्षा उमेदवार बघून मतदान केले जात हाेते. मात्र, गावातील गटांनी पॅनल तयार केले असल्याने गावातही राजकीय पक्षांचा प्रवेश झाला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत पुरुषांपेक्षा महिला सदस्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे राजकारण महिलांच्या भाेवती फिरणार आहे. आजपर्यंतच्या अनेक महिलांनी ग्रामपंचायत सक्षमरीत्या सांभाळल्या आहेत. शेतीची कामे जवळपास संपली असल्याने ग्रामीण भागातील मतदार पूर्णवेळ ग्रामपंचायतीच्या राजकारणात लक्ष घालत आहेत. 

प्रशासन सज्ज२९ ग्रामपंचायतींमध्ये काही ग्रामपंचायती माेठ्या आहेत. अशा ग्रामपंचायतींमध्ये दाेन ते तीन मतदान केंद्र ठेवण्यात आले आहेत. तालुकाभरात एकूण ९४ मतदान केंद्र आहेत. निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. एकूण ५२ हजार ६०४ मतदार आहेत. त्यामध्ये २६ हजार १४२ महिला व २६ हजार ४६२ पुरुष मतदारांची संख्या आहे. यामध्ये जवळपास १० टक्के नवीन मतदार आहेत. हे नवीन मतदार तरुण उमेदवारालाच पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे नवीन मतदारांचेही मत अतिशय महत्त्वाचे ठरणारे आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक