५ लाख ८४ हजारांचा माल पकडला
By Admin | Updated: July 2, 2014 23:17 IST2014-07-02T23:17:31+5:302014-07-02T23:17:31+5:30
सिरोंचा वनपरिक्षेत्राच्या वनकर्मचाऱ्यांनी अवैधरित्या आंध्रप्रदेशात नेण्यात येणारे सागवान, बैल, बंडी असा ५ लाख ८४ हजार ६१७ रूपयाचा माल बुधवारी पहाटे ४.३० वाजता जप्त केला. हा सर्व माल सिरोंचा

५ लाख ८४ हजारांचा माल पकडला
सिरोंचा वनविभागाची कारवाई : बैल व बंड्याही जप्त
सिरोंचा : सिरोंचा वनपरिक्षेत्राच्या वनकर्मचाऱ्यांनी अवैधरित्या आंध्रप्रदेशात नेण्यात येणारे सागवान, बैल, बंडी असा ५ लाख ८४ हजार ६१७ रूपयाचा माल बुधवारी पहाटे ४.३० वाजता जप्त केला. हा सर्व माल सिरोंचा वनकार्यालयात ठेवण्यात आला आहे.
गोपणीय माहितीच्या आधारे सिरोंचा वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नलीकुडा जंगल परिसरातून कोत्तापल्ली गावाकडे बैलबंडीने रस्त्यावरून नदी घाटाकडे जाणारा माल नलीकुडा बसस्थानकाजवळ पकडला. वनकर्मचारी व वनमजूर गस्तीवर असतांना या मालाची वाहतूक करण्यात येत होती. वनकर्मचाऱ्यांनी तस्करांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी वनकर्मचाऱ्यांवर प्रतिहल्ला केला. यावेळी वनकर्मचाऱ्यांनी तीन राऊंड गोळीबार केला. आरोपी मोक्यावरून १७ बैल घेऊन पसार झालेत. या कारवाईत १ लाख ५ हजार रूपये किंमतीच्या बंड्या व १ लाख ९५ हजार रूपये किंमतीचे १३ बैल, २ लाख ८४ हजार ६१७ रूपये किंमतीचे ४६ सागवान लठ्ठे ५.१५० घनमीटर लाकुड असा एकूण ५ लाख ८४ हजार ६१७ रूपयांचा माल जप्त करण्यात आला. सदर कारवाई सिरोंचाचे उपविभागीय वनाधिकारी वाय. एस. बहाले यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी ए. जी. करपे, क्षेत्र सहाय्यक बी. एम. खोब्रागडे, नियत रक्षक आर. जी. जवाजी, क्षेत्र सहाय्यक सिरोंचा, कारसपल्ली व वनमजूर यांनी पार पाडली. (शहर प्रतिनिधी)