दोन मृत्यूंसह ४८ नवीन बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST2021-06-06T04:27:30+5:302021-06-06T04:27:30+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित २९,५९६ जणांपैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २८३१६ वर पोहोचली आहे. सध्या ५५५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...

दोन मृत्यूंसह ४८ नवीन बाधित
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित २९,५९६ जणांपैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २८३१६ वर पोहोचली आहे. सध्या ५५५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण ७२५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. शनिवारी नोंद झालेल्या दोन मृत्यूंमध्ये आरमोरी तालुक्यातील ५४ वर्षीय महिला आणि मोहटोला येथील ७० वर्षीय महिलांचा समावेश आहे.
नवीन ४८ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ८, अहेरी तालुक्यातील ६, आरमोरी ३, भामरागड तालुक्यातील ४, चामोर्शी तालुक्यातील ३, एटापल्ली तालुक्यातील १, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये १, मुलचेरा तालुक्यातील १२, सिरोंचा तालुक्यातील ७, तर देसाईगंज तालुक्यातील ३ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ४३ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १३, अहेरी ४, आरमोरी १, चामोर्शी ७, एटापल्ली ९, मुलचेरा १, सिरोंचा २, कुरखेडा १, तसेच देसाईगंज येथील ५ जणांचा समावेश आहे.