जिल्ह्यात १९ मृत्यूंसह ४१७ नवीन कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:39 IST2021-04-23T04:39:34+5:302021-04-23T04:39:34+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित १६९३६ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १२७७३ वर पोहोचली. सध्या ३८८३ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. ...

जिल्ह्यात १९ मृत्यूंसह ४१७ नवीन कोरोनाबाधित
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित १६९३६ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १२७७३ वर पोहोचली. सध्या ३८८३ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण २८० जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. १९ नवीन मृत्यूमध्ये ६५ वर्षीय महिला अहेरी, ६३ वर्षीय पुरुष कुरखेडा, ६३ वर्षीय पुरुष आरमोरी, २७ वर्षीय युवक वडसा, ७० वर्षीय महिला पुराडा ता. कुरखेडा, ५२ वर्षीय महिला लाझेंडा गडचिरोली, ५२ वर्षीय महिला गणेश कॉलनी गडचिरोली, ५५ वर्षीय पुरुष आलापल्ली ता. अहेरी, ६६ वर्षीय पुरुष विदर्भनगर ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर, ६५ वर्षीय पुरुष विसाेरा ता. देसाईगंज, ५७ वर्षीय पुरुष ता. मूल जि. चंद्रपूर, ४८ वर्षीय पुरुष राजेंद्र वाॅर्ड देसाईगंज, ४३ वर्षीय पुरुष सुंदरनगर ता. मूलचेरा, ३० वर्षीय पुरुष नवेगाव गडचिरोली, ५० वर्षीय पुरुष ता. कुरखेडा, ६० वर्षीय महिला ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर, ४६ वर्षीय महिला सिंधी काॅलनी वडसा, ४६ वर्षीय पुरुष चामोर्शी, ७५ वर्षीय महिला बर्डी आरमोरी, जि. गडचिरोली यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.४२ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण २२.९३ टक्के, तर मृत्युदर १.६५ टक्के झाला.
नवीन ४१७ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १८३, अहेरी तालुक्यातील ४०, आरमोरी २८, भामरागड तालुक्यातील १०, चामोर्शी तालुक्यातील १६, धानोरा तालुक्यातील २३, एटापल्ली तालुक्यातील २०, कोरची तालुक्यातील २७, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये ११, मूलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये १२, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये ९, तर वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये ३८ जणांचा समावेश आहे. तर, आज कोरोनामुक्त झालेल्या ३५४ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १५४, अहेरी २१, आरमोरी २०, भामरागड १९, चामोर्शी १९, धानोरा २६ , एटापल्ली १०, मूलचेरा ४, सिरोंचा ३५, कोरची ११, कुरखेडा २० तसेच वडसा येथील २९ जणांचा समावेश आहे.