बंद झुगारून ४०० नागरिकांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:41 IST2018-08-02T00:40:24+5:302018-08-02T00:41:01+5:30
गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन व पोलीस मदत केंद्र कारवाफाच्या संयुक्त विद्यमाने नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर कारवाफा येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला. नक्षल बंदला झुगारून या मेळाव्याला कारवाफा परिसरातील ३५० ते ४०० नागरिकांनी हजेरी लावली.

बंद झुगारून ४०० नागरिकांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन व पोलीस मदत केंद्र कारवाफाच्या संयुक्त विद्यमाने नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर कारवाफा येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला. नक्षल बंदला झुगारून या मेळाव्याला कारवाफा परिसरातील ३५० ते ४०० नागरिकांनी हजेरी लावली. या मेळाव्यात विविध विभागातर्फे स्टॉल लावून शासकीय योजनांची जनजागृती करण्यात आली.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून धानोराचे तहसीलदार एम.जी.गणवीर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे, सीआरपीएफ १९२ बटालियनचे असिस्टंट कमांडंट विक्रमकुमार तिवारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चौधरी, अंनिसचे जिल्हाध्यक्ष उद्धव डांगे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.राजे, दंतचिकित्सक शिवपुजे, संगीता मांदाळे, मुक्तिपथचे प्रकाश कुनघाडकर, ग्रामसेवक संतोषवार, माजी जि.प.सदस्य शांता परसे, पं.स.सदस्य वनीता मंटकवार, कारवाफाच्या सरपंच प्रेमिला कुमरे, फुलबोडीच्या सरपंच मंगला करंगामी, पुस्टोलाच्या सरपंच रंजना आतला, पोलीस पाटील चित्रलेखा रायपुरे, सीमा करंगामी, दारूबंदी समितीच्या यामिनी कटकेलवार आदी उपस्थित होत्या.
या मेळाव्यात आरोग्य व व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांसाठी संगीत खुर्ची, हंडीफोड व लिंबू चमचा स्पर्धा घेण्यात आली. मुलींसाठी व्हॉलिबॉल स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आला. स्पर्धांमध्ये कारवाफा येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुलींनी प्रथम तर राजीव गांधी हायस्कूलच्या मुलींनी द्वितीय क्रमांक पटकाविला. या संघांना व्हॉलिबॉल व नेट देऊन गौरविण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमातील स्पर्धकांनी रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. मेळाव्याला कारवाफा येथील व परिसरातील महिला व पुरूषांचा मिळून ४०० जणांचा समुदाय उपस्थित होता. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांनी मार्गदर्शन केले.