मजुरांचे ट्रॅक्टर उलटून ४० मजूर जखमी, १२ जणांची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 10:44 IST2023-03-29T10:42:38+5:302023-03-29T10:44:29+5:30
सिरोंचामध्ये उपचार सुरू

मजुरांचे ट्रॅक्टर उलटून ४० मजूर जखमी, १२ जणांची प्रकृती गंभीर
रेगुंठा ( गडचिरोली) : सिरोंचा तालुक्यातील मोयाबीनपेठा जवळ मजुरांना घेऊन निघालेले ट्रॅक्टर उलटले, यात ४० जण जखमी झाले. हा अपघात २७ मार्चला सायंकाळी झाला.
मोयाबीनपेठा येथे सध्या मिरची तोडणीचे काम सुरु आहे. त्यासाठी पिरमेडा गावचे ४० मजूर लासमय्या दुर्गम यांनी आपल्या शेतात आणले होते. मिरची तोडणीचे काम आटोपल्यावर सायंकाळी ट्रॅक्टरमधून मजूर गावी जाण्यासाठी निघाले. मोयाबीनपेठा गावापासून एक किलोमीटरवर ट्रॅक्टर उलटल्याने ४० जण जखमी झाले. त्यापैकी १२ जण गंभीर जखमी आहेत. मोयाबीनपेठा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर उपचार करण्यात आले.
सुरक्का बोंदय्या जिल्हापली, लिंगक्का दुर्गय्या चेंनुरी, पेंटक्का किष्टय्या चेंनुरी,सत्यक्का मैसल्ला जिल्हापेली, सुकना व्येंकटी चेंनुरी, कमला राजय्या चेंनुरी, लक्ष्मी लचन्ना चेंनुरी, कमला व्येंकटी चेंनुरी, प्रमिला बापू चेंनुरी, चिन्नक्का रामकिष्टु चिलमुला, प्रमिला शंकर चेंनुरी, रामक्का पोचमा कुंटाला यांना उपचारासाठी सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.