बचत गटांना ३९३ परवाने

By Admin | Updated: August 9, 2014 01:10 IST2014-08-09T01:10:39+5:302014-08-09T01:10:39+5:30

राज्य शासनाच्या २५ जून २०१० च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करीत जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत जिल्ह्यातील स्वयंसाहाय्यता महिला बचत ...

393 licenses for the savings groups | बचत गटांना ३९३ परवाने

बचत गटांना ३९३ परवाने

दिलीप दहेलकर गडचिरोली
राज्य शासनाच्या २५ जून २०१० च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करीत जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत जिल्ह्यातील स्वयंसाहाय्यता महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकानाचे २१९ व केरोसीन दुकानाचे १८४ असे एकूण ३९३ परवाने २०११ पासून दिले आहेत. यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात मोलाची मदत झाली आहे.
३ नोव्हेंबर २००७ रोजी राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने शासन निर्णय काढून स्वयंसाहाय्यता बचतगटांना स्वस्त धान्य दुकान व करोसीन दुकानाचे परवाने देण्याची तरतूद केली. त्यानंतर राज्य शासनाने २५ जून २०१० रोजी नवा शासन निर्णय काढून महिला तसेच पुरूष स्वयंसाहाय्यता बचत गटांना स्वस्तधान्य व केरोसीन दुकानाचे परवाने देण्याची तरतूद केली. जिल्हा प्रशासनाने या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करीत आवश्यकतेनुसार महिला बचत गटांना स्वस्तधान्य व केरोसीन दुकानाचे परवाने दिले आहेत. जिल्हा पुरवठा विभागाने २५ जून २०१० च्या शासन निर्णयानुसार महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकानाचे एकूण २१९ परवाने दिले आहेत. यात गडचिरोली तालुक्यात १७, धानोरा तालुक्यात २९, चामोर्शी तालुक्यात ३२, मुलचेरा तालुक्यात १९, देसाईगंज तालुक्यात १०, आरमोरी तालुक्यात १३, कुरखेडा तालुक्यात १७, कोरची तालुक्यात २१, अहेरी तालुक्यात १३, एटापल्ली तालुक्यात २३, भामरागड तालुक्यात ५ व सिरोंचा तालुक्यात २५ परवाने देण्यात आले आहेत. एकूण १ हजार ६८८ गावांकरिता जिल्हाभरात स्वस्त धान्य दुकानाचे एकूण १ हजार ११० परवाने देण्यात आले असून यात १८९ वैयक्तिक तर स्वयंसहाय्यता बचत गटांना दिलेल्या १२१ परवान्यांचा समावेश आहे. परवाने दिल्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत असून महिलांची प्रगती होत आहे. पुरवठा विभागाने नवीन स्वस्त धान्य दुकानाच्या मंजुरीसाठी एकूण १४३ जाहीरनामे काढले आहेत. ग्रामसभेच्या शिफारशीकरिीाा पुरवठा विभागाकडून एकूण ७५ परवाने सादर करण्यात आल्याची माहिती आहे.

Web Title: 393 licenses for the savings groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.