शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील ३५ क्विंटल मोहसडवा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST

बुधवारी सकाळी ६ वाजतापासून पोलीस आणि मुक्तिपथ चमूने सर्वप्रथम बोथेडा गावाला लागून असलेला तलाव परिसर पिंजून काढला असता मोहसडवा भरून असलेले सहा ड्राम सापडले. हा सडवा तलावात टाकून नष्ट करण्यात आला. यानंतर मुरूमबोडी जंगल परिसरात तीन ठिकाणी ३९ ड्रम सडवा सापडला. चार ठिकाणी दारूभट्ट्या लावण्यात आल्या होत्या. अ‍ॅल्युमिनियमचे २२ हंडे पोलिसांना सापडले. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला.

ठळक मुद्दे४५ ड्रममध्ये होता भरून : मुक्तिपथ आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दारू गाळण्यासाठी टाकलेला तब्बल ३५ क्विंटल मोहसडवा गडचिरोली तालुक्यातील मुरूमबोडी आणि बोथेडा येथील जंगल शिवारातून पोलिसांनी आणि मुक्तिपथ तालुका चमूने नष्ट केला. चार ठिकाणी जवळपास ४५ ड्रममध्ये हा सडवा टाकण्यात आला होता. दारूभट्ट्या आणि गाळण्यासाठी लागणारे साहित्यही पोलिसांनी नष्ट केले. २ लाखांचा हा मुद्देमाल असल्याचे सांगण्यात आले.मुरूमबोडी आणि बोथेडा या दोन्ही गावांमध्ये दारूविक्री मोठ्या प्रमाणात होते. बहुतांश घरी दारू गाळली जाते. आसपासच्या अमिर्झा, आंबेशिवनी गिलगाव, खुर्सा यासह २० गावांमध्ये ही दारू पोहोचवली जाते. तसेच जवळच्या गावातील लोकही येथे मोठ्या प्रमाणात दारू पिण्यासाठी येतात.जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात मोहाचा सडवा टाकल्याची माहिती मुक्तिपथ तालुका चमुला मिळाली होती. त्यांनी गडचिरोली पोलिसांना माहिती दिली. बुधवारी सकाळी ६ वाजतापासून पोलीस आणि मुक्तिपथ चमूने सर्वप्रथम बोथेडा गावाला लागून असलेला तलाव परिसर पिंजून काढला असता मोहसडवा भरून असलेले सहा ड्राम सापडले. हा सडवा तलावात टाकून नष्ट करण्यात आला. यानंतर मुरूमबोडी जंगल परिसरात तीन ठिकाणी ३९ ड्रम सडवा सापडला. चार ठिकाणी दारूभट्ट्या लावण्यात आल्या होत्या. अ‍ॅल्युमिनियमचे २२ हंडे पोलिसांना सापडले. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला.ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक डी.डी.उदार यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार बी.एस. ठाकरे, पोलीस हवालदार खरकाडे, डांगे, खोब्रागडे, रामटेके यांच्या चमूने केली. मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर आणि उपसंघटक रेवनाथ मेश्राम या कारवाईत सहभागी झाले होते.देसाईगंजमध्ये ११ लिटर दारू जप्तदेसाईगंज शहरातील डॉ.आंबेडकर वॉर्ड येथील मुक्तिपथ संघटनेने ११ लिटर मोहाची दारू पकडली. एका इसमाकडे सडवा असून दारूच्या कॅन असल्याची माहिती वॉर्ड संघटनेला बुधवारी सकाळी मिळाली. त्यांनी या घराची तपासणी केली असता एक ड्रम मोहसडवा आणि ११ लिटर दारू सापडली. महिलांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी सडवा नष्ट करून दारू जप्त केली. आणखी एका महिलेकडे सडवा असल्याचे संघटनेला सायंकाळी निदर्शनास आले. त्यांनी या महिलेकडील एक ड्रम सडवा नष्ट केला.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस