शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

३४.५४ कोटींची मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:13 PM

पावसाची कमतरता आणि ढगाळ वातावरणामुळे धान व कापसावर आलेल्या रोगराईचा यावर्षी अनेक शेतकºयांना फटका बसला. या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीच्या निकषानुसार जिल्ह्यात ३४ कोटी ५४ लाख रुपयांची मदत ....

ठळक मुद्देरोगग्रस्त पिकांचे नुकसान : ६९ हजार ५१५ शेतकरी ठरले पात्र

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाची कमतरता आणि ढगाळ वातावरणामुळे धान व कापसावर आलेल्या रोगराईचा यावर्षी अनेक शेतकºयांना फटका बसला. या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीच्या निकषानुसार जिल्ह्यात ३४ कोटी ५४ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठी ६९ हजार ५१५ शेतकरी पात्र ठरले आहेत.जिल्ह्यात धान या मुख्य पिकासोबत काही प्रमाणात कापसाचेही पीक घेतले जाते. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार यावर्षी १ लाख ३९ हजार ४८५ शेतकºयांनी १ लाख ७३ हजार २५९ हेक्टर क्षेत्रावर धानपीकाची लागवड केली होती. त्यापैकी ६८ हजार ६०३ शेतकऱ्यांच्या ३२ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रावरील धानपीकाचे मावा-तुडतुड्यामुळे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यात कोरडवाहू (जिरायती) क्षेत्रावरील पीक १४ हजार ४५५ हेक्टर तर बागायती क्षेत्रावरील पीक १८ हजार ३४२ हेक्टर आहे. शासनाच्या निकषानुसार जिरायती क्षेत्रावरील ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसानीसाठी ९ कोटी ५६ लाख १२ हजार ५५६ रुपयांचा मदत तर बागायती क्षेत्रावरील पीकासाठी २४ कोटी ५६ लाख ५८ हजार २८५ रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे.यावर्षी ८५६० शेतकऱ्यांनी ११ हजार ६५७ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती. त्यापैकी ९१२ शेतकºयांच्या ५९७ हेक्टरवरील पीकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यात जिरायती शेतीचे क्षेत्र ५८३ हेक्टर तर बागायती क्षेत्र अवघे १४ हेक्टर आहे. या शेतकऱ्यांना ४१ लाख ३६ हजार १४० रुपयांची मदत मिळणार आहे. कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार जिल्हा प्रशासनाने मदतीसाठी पात्र असणाºया या शेतकऱ्यांची माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठविली आहे. त्यांच्यामार्फत ही माहिती राज्य शासनाकडे गेल्यानंतर शासन स्तरावर प्रत्यक्ष मदतीची रक्कम मंजूर केली जाईल. त्यासाठी काही महिन्यांची प्रतीक्षा शेतकºयांना करावी लागणार आहे.शासन निर्णयानुसार ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान असणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा लाभ दिला जाणार आहे. विशेष म्हणजे सिरोंचा आणि एटापल्ली या दोन तालुक्यातील एकही शेतकरी धान किंवा कापूस पिकाच्या नुकसानीसाठी पात्र ठरलेला नाही.६८०० ते २७ हजारापर्यंत मदत मिळणारराज्य शासनाच्या जीआरनुसार जिरायती शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी ६८०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) तर बागायती शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) अशी मदत मिळणार आहे. त्यामुळे मदतीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना किमान ६८०० ते जास्तीत जास्त २७ हजार एवढी मदत मिळणार आहे.कृषी विभागामुळे अहवालास विलंबजिल्हाधिकाऱ्यांनी ८ डिसेंबरला काढलेल्या आदेशानुसार १५ दिवसात पिकांच्या सर्व्हेक्षणाचा अहवाल सादर करायचा होता. परंतु त्यासाठी कृषी विभागाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला. विशेष म्हणजे आॅक्टोबर २०१७ पर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा अहवालही कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेला नाही. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांच्या कार्यप्रमाणीवर संताप व्यक्त केला जात आहे.