भामरागड तालुक्यात ३० तास वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST2021-04-24T04:37:11+5:302021-04-24T04:37:11+5:30
एटापल्ली, भामरागडचे २ अधिकारी व २२ कर्मचाऱ्यांना दिवसरात्र काम करावे लागले. त्यानंतर भामरागड तालुक्याचा वीजपुरवठा सुरळीत झाला. कोरोनाच्या दहशतीतही ...

भामरागड तालुक्यात ३० तास वीजपुरवठा खंडित
एटापल्ली, भामरागडचे २ अधिकारी व २२ कर्मचाऱ्यांना दिवसरात्र काम करावे लागले. त्यानंतर भामरागड तालुक्याचा वीजपुरवठा सुरळीत झाला.
कोरोनाच्या दहशतीतही कर्मचाऱ्यांची कसरत अविरत सेवा सुरू होती.
मानवी साखळी तोडून कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १ मे पर्यत संचारबंदी जाहीर केली आहे. या कालावधीत कोरोनाच्या दहशतीत बहुतांश जनता घरीच बसून आहे. मात्र बुधवारी सायकाळी ६ वाजताच्या दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पाऊस बरसला, त्यामुळे वीजपुुरवठा खंडित झाला. एटापल्ली भामरागड वीज वाहिनीवर कांदोळी बुर्गी मधात झाड पडले व १० ते १२ ठिकाणी इन्सलेटर फुटल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळाली.
एटापल्ली येथील वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता हितेश मडावी व १० कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामी लागले., मात्र बहुतेक ठिकाणी फाॅल्ट होता. भामरागडचेही उप कार्यकारी अभियंता सचिन काळे सोबत लाईनमेन पंकज मेश्रम, संदीप गाघरगुंडे, नदीम शेख, शशिकांत ढोलेसह एकूण दोन अधिकारी २२ कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्री दीड वाजेपर्यंत जंगलात राहुन इन्सुलेटर काम पूर्ण करून तब्बल ३० तासांनंतर भामरागड वीजपुरवठा सुरळीत झाला. कोरोनाच्या दहशतीत सर्व नागरिक घरी बसले तरी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी रात्रभर जंगलात राहुन वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांचेही महत्त्वाचे कार्य आहे, हे विसरुन चालणार नाही. उप कार्यकारी अभियंता सचिन काळे, उप कार्यकारी अभियंता हितेश मडावी यांच्या नेतृत्वात दहशतीच्या कालावधीतही वीज कर्मचारी स्वतःला वाहून घेत आहेत.
गुरवारी रात्री दीड वाजेपर्यंत जंगलात राहून काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.