एका मृत्युसह २९ नवीन कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:25 IST2021-06-24T04:25:21+5:302021-06-24T04:25:21+5:30

जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ३०,१५० पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या २९,१८४वर पोहोचली. तसेच सध्या २२७ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. ...

29 new corona infected with one death | एका मृत्युसह २९ नवीन कोरोनाबाधित

एका मृत्युसह २९ नवीन कोरोनाबाधित

जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ३०,१५० पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या २९,१८४वर पोहोचली. तसेच सध्या २२७ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. बुधवारला ५० वर्षीय पुरुष आक्सापूर, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर येथील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८० टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ०.७५ टक्के, तर मृत्यू दर २.४५ टक्के झाला.

नवीन २९ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ८, भामरागड तालुक्यातील १, चामोर्शी तालुक्यातील ८, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये ३, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये ३, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये ६ जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या ११ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील २, अहेरी १, आरमोरी २, चामोर्शी ३, एटापल्ली २, सिरोंचातील एकाचा समावेश आहे.

Web Title: 29 new corona infected with one death